गणेश शिंदे -- कोल्हापूर -सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने दोन वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने सुरू केलेल्या ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य’ योजनेत राज्यात कोल्हापूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर असल्याचे आशादायक चित्र आहे. जिल्ह्यात दोन वर्षांत सुमारे ३० हजार ३२८ जणांनी याचा लाभ घेतला, तर सुमारे ८६ कोटी ४५ लाख रुपये राज्य सरकारने यावर खर्च केला आहे. या योजनेत न बसलेल्या दुर्धर आजारांवरील उपचारांकरिता येणाऱ्या खर्चासाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’ हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत रुग्णांना एक लाखापासून ते दोन लाखांपर्यंत मदत मिळणार आहे. या योजनेमुळे सर्वसामान्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत ९७१ आजारांचा समावेश आहे. दीड लाख रुपयांपर्यंतचा लाभ सर्वसामान्यांना या योजनेतून मिळतो. दोन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्णात सुमारे ३० हजार ३२८ जणांनी लाभ घेतला, तर ८६ कोटी रुपये यावर खर्च केला. योजनेतील समाविष्ट रुग्णालयांना राज्य सरकारकडून ‘नॅशनल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन’या विमा कंपनीकडून परतावा (रिटर्न) दिला जातो. जिल्ह्णात सध्या ३२ रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत.दरम्यान, या योजनेमध्ये ९७१ आजार असले, तरी काही आजारांचा या योजनते समावेश नाही, अशा (राजीव गांधीमध्ये न बसणाऱ्या शस्त्रक्रिया) आजारांवर उपचारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून मदत केली जाणार आहे. यामध्ये हृदयशस्त्रक्रिया, ट्रामा (रस्त्यावरील भीषण अपघात), मेंदूमधील रक्तस्त्राव, कर्करोग (सर्व आजार) या आजारांचा समावेश आहे. त्यासाठी त्याला एक लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. मुंबई प्रथम; शेवट नंदूरबार राज्यात या योजनेमध्ये पहिला क्रमांक मुंबई जिल्हा, दुसरा अहमदनगर, तर तिसरा औरंगाबाद या जिल्ह्णांचा नंबर लागतो. त्या पाठोपाठ चौथा क्रमांक कोल्हापूर जिल्ह्णाचा लागला असून, पुणे जिल्ह्णाचा पाचवा, तर नाशिक सहाव्या क्रमांकावर आहे.नंदूरबार जिल्ह्णाचा क्रमांक शेवट लागतो. या एका वर्षात मुंबईमध्ये २१ हजार ६०५ जणांनी लाभ घेतला. यासाठी ६९ कोटी १७ लाख ४७ हजार ६१० रुपये खर्च झाले आहेत.तर नंदुरबार जिल्ह्णात वर्षात केवळ ९० जणांनी लाभ घेतला. यासाठी सहा लाख ५१ हजार रुपये खर्च करण्यात आले.कोल्हापूर जिल्हा दृष्टिक्षेपात...वर्ष लाभ खर्चरुग्णालय परतावा२१ नोव्हेंबर २०१३ ते१२ हजार २५०३५ कोटीसर्व२० नोव्हेंबर २०१४ २१ नोव्हेंबर २०१४ ते १८ हजार ७८ ५१ कोटी सुमारे ४० कोटी रुपये २०नोव्हेंबर २०१५४५ लाख(आजअखेर)अशी असते प्रक्रिया...मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामधून ज्यांना लाभ घ्यावयाचा असेल त्यांना राजीव गांधी योजनेतील समाविष्ठ असलेल्या संबंधित रुग्णालयांच्या डॉक्टरांचा दाखला द्यावा लागणार आहे. या दाखल्यामध्ये रुग्णाच्या खर्चाचा तपशील, त्याच्या बसत नसलेल्या आजाराचे नाव डॉक्टरला द्यावे लागणार आहे. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाइकांनी हा दाखला घेऊन ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ’या नावाने अर्ज तयार करावा व हा अर्ज जिल्हा समन्वयक यांच्याकडे शेरा मारून आणावा. या दाखल्यावर शेरा मारल्यानंतर नातेवाइकांनी हा अर्ज टपालाने पाठवावा, अथवा स्वहस्ते कक्षाकडे द्यावा. या कक्षातूनच संबंधित रुग्णाला ही मदत मिळणार आहे.
‘राजीव गांधी आरोग्य’मध्ये कोल्हापूर चौथ्या स्थानी
By admin | Updated: November 27, 2015 01:04 IST