शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘आयआरबी’वर गुन्हा दाखल

By admin | Updated: October 24, 2014 00:17 IST

‘एन. डी.’ यांचा दणका : रस्ता खचल्याप्रकरणी दोन तास ‘रास्ता रोको’; प्रशासनाचे नमते

कोल्हापूर : रस्ता खचल्याप्रकरणी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली फुलेवाडी पेट्रोल पंपाच्या दारात आज, गुरुवारी तब्बल दोन तास रास्ता रोको केला. सुरुवातीस जुजबी उत्तरे देत, गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या पोलीस प्रशासनास ‘वर्दीची शान राखा. या प्रत्येक मिनिटाचा जबाब द्यावा लागेल,’ असा दम प्रा. एन. डी. पाटील यांनी भरला. अखेर पोलिसांनी ‘एन. डी.’यांच्या दणक्यापुढे नमते घेत, ‘आयआरबी’वर महापालिकेच्या पत्राच्या आधारे गुन्हा नोंद केला. रंकाळ्याजवळील रस्त्यावरील पदपथ व चॅनेलचा मोठा भाग काल, बुधवारी शेतात कोसळला. खराब रस्त्याप्रकरणी आयआरबीवर गुन्हा नोंद करण्याची मागणी करीत कृती समितीने रास्ता रोको केले. कार्यकर्त्यांनी आयआरबीविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आमदार चंद्रदीप नरके, चंद्रकांत पाटील व अमल महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. सकाळी साडेअकरापासून दीड वाजेपर्यंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रस्त्यावर बसून होते. सुरुवातीस शहर पोलीस उपअधीक्षक भरतकुमार राणे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत आयआरबीवर गुन्हा नोंद करता येणार नाही, असे सांगितले. गुन्हा नोंदीस टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवर ‘एन. डी.’ अक्षरश: कडाडले. ‘गुन्हा नोंद न करता आयआरबीची वकिली करण्यासाठीच जनतेचा पगार घेता काय? अंगावरील वर्दीची शान व मान राहील, असे काम करा. इतर गुन्ह्णांत प्रथम तपास करून गुन्हा नोंदविता काय? आॅनलाईन गुन्हा नोंदीची कशाला नाटके करता? आयआरबीवर गुन्हा नोंद केल्याशिवाय जाग्यावरून हलणार नाही.’ अशी गर्जना करीत एन. डी. पाटील यांनी केलेल्या हल्लाबोलमुळे हबकलेल्या राणे यांनी वरिष्ठांशी चर्चा करतो, असे सांगत माघार घेतली.यानंतर आंदोलन ठिकाणी आलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ‘एन. डी.’ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘आत्ताच कृती समितीचे व महापालिकेचे पत्र मिळाले असून गुन्हा नोंद करतो. आंदोलन मागे घ्यावे,’ अशी विनंती गोयल यांनी केली. ‘जुजबी उत्तरे देऊन दिशाभूल करू नका. कालच आम्ही पोलिसांना पत्र दिले आहे. खोटे बोलू नका. तत्काळ गुन्हा दाखल करून त्याची प्रत द्या.’ असे एन. डी. पाटील यांनी सुनावले. अखेर पोलिसांनी आयआरबी व एमएसआरडीसीवर खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. यानंतरच दोन तासांचा तणाव निवळला. आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नगरसेवक सत्यजित कदम, प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, बाबा पार्टे, रमेश मोरे, अजित सासने, दीपाताई पाटील, वैशाली महाडिक, चारूलता चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, भगवान काटे, प्रसाद पाटील, आदींसह कृ ती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)महापालिकेचे पत्रमहापालिकेने रस्त्याचे हस्तांतरण आयआरबीला के ले आहे. देखभाल व दुरुस्तीची सर्व जबाबदारी आयआरबीची आहे. रस्ते करून घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाची आहे. रस्ते मानवी जीवितास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने झाल्यास याबाबत सर्व जबाबदारी आयआरबी व महामंडळाची असेल, अशा आशयाचे पत्र महापालिकेने कृती समितीला दिले आहे. या आधारेच आयआरबी व महामंडळावर गुन्हा नोंद करण्याची मागणी करीत असल्याची माहिती अ‍ॅड. बाबा इंदुलकर व चंद्रकांत यादव यांनी दिली.आय.आर.बी.विरोधात २८३, ३३६ कलमांने गुन्हाकोल्हापुरातील रंकाळा ते फुलेवाडी पेट्रोलपंपाजवळचा रस्ता खचल्याने काल, बुधवारी याबाबत चंद्रकांत शंकरराव यादव (रा. १५०७, ए वॉर्ड, शिवाजी पेठ) यांनी जुना राजवाडा पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी महापालिकेचे आयुक्त व विशेष सहायक सरकारी वकील, कोल्हापूर यांना लेखी पत्र देऊन त्यांचा अभिप्राय घेतला. त्यामध्ये या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी आय.आर.बी.ची असल्याचा अभिप्राय आयुक्तांनी आज, गुरुवारी दिला. त्यामुळे पोलिसांनी अर्जदार यांच्या चौकशीवरून आय.आर.बी. कंपनी, कोल्हापूर यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहिता कलम २८३ व ३३६ अनुसार गुन्हा दाखल केला.खचलेल्या रस्त्याची डागडुजीरंकाळा-फुलेवाडीदरम्यान पेट्रोल पंपासमोरील दिवाळीदिवशी बुधवारी पहाटे ‘आयआरबी’च्या खचलेल्या रस्त्याची आज, गुरुवारी आयआरबीने डागडुजी केली. रस्त्याच्या कडेला दोन फूट रूंद व १०० मीटर लांब पडलेली मोठी भेग खरमाती टाकून बुजविली आहे. जुजबी दुरुस्ती केल्याने या चरीत अवजड वाहन अडकून मोठा आपघात होण्याची भीती वाहनधारक व्यक्त करत आहेत. रस्त्याचा शेतात कोसळलेला पूर्ण भाग काढून दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.टोल आंदोलकांना आमदारांची आश्वासनेचंद्रकांत पाटील - टोल हद्दपार करण्याची जबाबदारी भाजपचे सरकार पार पाडील.अमल महाडिक - टोल हद्दपार होईपर्यंत कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच राहील.चंद्रदीप नरके - यापुढेही टोलविरोधी लढ्यात अग्रभागी राहू. सभागृहात ताकदीने टोलचा प्रश्न मांडणार.