शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-- कांदा दर पडल्याने शेतकरी आक्रमक

By admin | Updated: September 2, 2014 00:10 IST

बाजार समितीमधील सौदे पाडले बंद : व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अरेरावी

कोल्हापूर : कांद्याचे दर पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज, सोमवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सौदे बंद पाडले. इतर मार्केटप्रमाणे दर देण्याची मागणी करीत भरपावसात सौदा मार्केटमध्येच शेतकऱ्यांनी ठिय्या मारला. सौदे बंद केल्यानंतर एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा वापरल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. बाजार समितीत सध्या जुन्या-नव्या कांद्यांची आवक सुरू आहे. आज २३ गाड्यांची आवक झाली आहे. सकाळी अकरा वाजता कांदा सौदे सुरू झाले. अठरा रुपयांवर दर जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. समितीचे सचिव संपतराव पाटील, सहायक सचिव मोहन सालपे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण इतर मार्केटप्रमाणे दर मिळाला पाहिजे, या मागणीवर शेतकरी ठाम राहिले. नागपूर, भिवंडी मार्केटमध्ये २२ रुपये किलोने कांदा आहे, मग येथे कमी का? अशी विचारणा करत शुक्रवारी १४ रुपयांनी विकलेला कांद्याचा साडेसहा रुपये दर काढता ही मनमानी चालणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. ही बाजार समिती शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची आहे, अशी विचारणा करीत एक व्यापारी शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर जाण्यास सांगतो. ही मग्रूरी खपवून घेणार नाही. एका बाजूने दर पाडून शेतकऱ्यांना लुटायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावरच अरेरावी करायची, हाच काय तुमचा कारभार? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी समिती प्रशासनाला केला. संबंधित व्यापाऱ्याने माफी मागितल्याशिवाय सौदे सुरू होणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अखेर दुपारी अडीच वाजता समिती प्रशासनाने शेतकरी व व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेऊन वादावर तोडगा काढला. दुपारी तीननंतर सौदे पूर्ववत सुरू झाले. (प्रतिनिधी)लायसन्स रद्द कराव्यापाऱ्यांना कांदा परवडत नसेल, तर बाजार समितीने मार्केट बंद करीत असल्याचे सांगावे. शेतकरी पर्याय बघेल. दोनशे किलोमीटरवरून येऊन अपमान करता. शेतकऱ्यांवर अरेरावी करणाऱ्या व्यापाऱ्यांची लायसन्स रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. वरातीमागून घोडेतीन तास सौदे ठप्प झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. अशा वेळी तातडीने प्रशासक मंडळाने हस्तक्षेप करून तोडगा काढणे गरजेचे होते; पण दुपारी दोनपर्यंत इकडे अशासकीय प्रशासक मंडळातील एकही सदस्य फिरकला नाही. दोननंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष समितीत आले. व्यापारी जाणीवपूर्वक दर पाडतात. सांगली मार्केटमध्ये २३ रुपये दर चालू असताना येथे १७ रुपयांच्यावर दर जात नाही. उलट आम्हालाच अरेरावीची भाषा वापरली जाते आणि बाजार समिती मूग गिळून गप्प बसते, हे योग्य नाही. - संतोष तोडकर, शेतकरी, श्रीगोंदा