शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

कोल्हापूर : अर्थसंकल्पात रोजगाराधारित उत्पादक क्षेत्रास प्राधान्य हवे : जे. एफ. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 16:39 IST

देशाचा आर्थिक विकास हा रोजगार दरावर अवलंबून असतो. सद्य:काळातील रोजगाराची स्थिती विचारात घेता, आगामी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा उत्पादक अशा रोजगार निर्मिती क्षेत्रास प्राधान्य देणारा असावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी येथे केले.

ठळक मुद्दे शिवाजी विद्यापीठातील चर्चासत्रमहिला सबलीकरणाचे धोरण, जीएसटीची तुलनात्मक मांडणी

कोल्हापूर : देशाचा आर्थिक विकास हा रोजगार दरावर अवलंबून असतो. सद्य:काळातील रोजगाराची स्थिती विचारात घेता, आगामी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा उत्पादक अशा रोजगार निर्मिती क्षेत्रास प्राधान्य देणारा असावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या बँक आॅफ इंडिया चेअर इन रुरल बँकिंग आणि अर्थशास्त्र अधिविभागातर्फे ‘अर्थसंकल्प २०१८ पूर्व’ चर्चासत्रात ते बोलत होते. विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, तर उद्योजक सुरेंद्र जैन प्रमुख उपस्थित होते.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. पाटील म्हणाले, कल्याणकारी राज्याची निर्मिती करतानाच वित्तीय तुटीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात सरकारला मोठी कसरत करावी लागणार आहे. आगामी अर्थसंकल्पात वित्तीय कल्याणकारी, न्यायिक कल्याणकारी व वितरण कल्याणकारी या घटकावर अधिक लक्ष द्यावे. याशिवाय जीएसटी अंमलबजावणीनंतर प्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा, स्वयंरोजगार व रोजंदारीवर काम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला करप्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचे धोरण सरकारने अर्थसंकल्पातून स्वीकारावे.

कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, शिक्षण व संशोधन क्षेत्रांत सरकारने अधिकाधिक भर देण्याबरोबर शिक्षण क्षेत्र करमुक्त करावे. या कार्यक्रमास कार्यशाळेचे संयोजक डॉ. व्ही. बी. ककडे, समन्वयक डॉ. एम. एस. देशमुख, मानव्यशास्त्र अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. एस. कांबळे, आदी उपस्थित होते. डॉ. ककडे यांनी प्रास्ताविक केले. सहायक प्राध्यापक एस. पी. पंचगल्ले यांनी सूत्रसंचालन केले. सहायक प्राध्यापक एस. टी. कोंबडे यांनी आभार मानले.महिला सबलीकरणाचे धोरण, जीएसटीची तुलनात्मक मांडणीया चर्चासत्रात अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी महिला सबलीकरण धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील लिंगतफावत दूर करण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात त्या प्रकारची तरतूद करावी, असे संगितले. सुरेंद्र जैन यांनी जीएसटी व उद्योगक्षेत्र यांची तुलनात्मक मांडणी केली.

मनीष झंवर यांनी कृषी विकासासाठी भागीदारी शेतीची आवश्यकता स्पष्ट केली. डॉ. ए. आर. पडोशी यांनी विकास आणि रोजगार यांचा परस्परसंबंध व त्यांची सर्वसमावेशक वृद्धीतील भूमिका स्पष्ट केली. महेश शिंदे यांनी कर संरचना, शाश्वत विकास यांचा आर्थिक दृष्टिकोनातून आढावा घेतला.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ