शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
3
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
4
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
5
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
6
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
7
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
8
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
9
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
10
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
11
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
13
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
14
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
15
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
16
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
17
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
18
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
19
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
20
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा

कोल्हापूरच विभागाची तिन्ही गटात आगेकूच

By admin | Updated: September 26, 2015 00:19 IST

फुटबॉल : राज्यस्तरीय शालेय स्पर्धेस शानदार प्रारंभ, २४ संघांचा सहभाग

कोल्हापूर : क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेच्या शुक्रवारी पहिल्या दिवशी कोल्हापूर विभागाच्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत पुढील फेरी गाठली. कोल्हापूरचे तिन्ही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे शुक्रवारी सकाळी उद्घाटनाच्या सामन्यात कोल्हापूर विभाग संघ विरुद्ध लातूर विभाग संघ यांचा सामना झाला. हा सामना कोल्हापूर विभागाने ट्रायबे्रकरवर ४-२ असा जिंकला; तर दुसऱ्या सामन्यात पुणे विभागाने नाशिक विभागावर ५-० अशी एकतर्फी मात केली. पुणेकडून गोल्ड रणदिवे याने दोन, तर ऐमर अ‍ॅडम, फ्रँकलिन नागरथ, करण मोडक यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवीत विजय संपादन केला. तिसऱ्या सामन्यात औरंगाबाद विभागाने मुंबई विभागाचा ४-३ असा टायबे्रकरवर पराभव केला; तर चौथ्या सामन्यात नागपूर विभागाने अमरावती विभागावर ३-१ अशी मात केली. नागपूरकडून बादल सोरेन, सईद अन्वर, अल्लसा उदीन यांनी प्रत्येकी एक, तर अमरावतीकडून पवन सकपाळेने एकाकी झुंज देत एक गोल नोंदवीत पुढील फेरीत प्रवेश केला.विभागीय क्रीडासंकुलात झालेल्या १७ वर्षांखालील गटात पहिला सामना अमरावती विभागाने लातूर विभागाचा ८-० असा एकतर्फी धुव्वा उडविला. अमरावतीकडून जव्वाद शेखने ४, शंतनू भोवळेने २, तर गौरव जोंधळे व संकेत टोटेवार यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात मुंबई विभागाने नागपूर विभागाचा ४-१ असा पराभव केला. या सामन्यात मुंबईकडून प्रथमेश बामणेने दोन, तर रोहित शेट्टी, अंकित सक्सेना यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. तिसऱ्या सामन्यात कोल्हापूर संघाने पुणे विभागाचा ५-२ असा टायबे्रकरवर पराभव केला. कोल्हापूरकडून तेजराज अपराध, तर पुणेकडून निखिल पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला. छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या १९ वर्षांखालील गटात मुंबई विभागाने औरंगाबाद विभागाचा ५-० असा धुव्वा उडविला. मुंबईकडून आशिष हलगे व साऊद शेख यांनी प्रत्येकी दोन, तर अमित चितगड्डे यांनी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात नाशिक विभागाने पुणे विभागाचा ४-१ असा टायब्रेकरवर पराभव केला. तिसऱ्या सामन्यात नागपूर विभागाने अमरावती विभागाचा ३-० असा एकतर्फी पराभव केला. नागपूरकडून रोहित कनोजियाने दोन, तर मिहीर नाईक याने एक गोल नोंदविला. चौथ्या सामन्यात यजमान कोल्हापूर विभागाने लातूर विभागाचा ७-० असा धुव्वा उडविला. कोल्हापूरकडून संदीप गोंधळीने ३, तर शाहू भोईटे, अनिकेत जोशी, प्रथमेश हेरेकर, पवन सरनाईक यांनी प्रत्येकी एक गोल करीत आगेकूच केली. या विजयामुळे कोल्हापूर संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. (प्रतिनिधी)श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते उदघाटनस्पर्धेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते ध्वजवंदनाने झाले. यावेळी अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक संचालनालयाचे आयुक्त राजाराम माने यांच्यासह महापौर वैशाली डकरे, आमदार चंद्रदीप नरके, क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील, आर. डी. पाटील, ‘प्रिन्स शिवाजी’चे संचालक विनय पाटील, आदी उपस्थित होते.