शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप‘

By admin | Updated: June 28, 2016 00:44 IST

सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू असून, बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांनी नि:श्वास सोडला आहे. गेले अनेक दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाने सोमवारी पहाटेपासून कोल्हापूर जिल्ह्णात हजेरी लावली आहे. शेजारील कोकणात गेले आठ दिवस जोरदार पाऊस सुरू असताना कोल्हापुरात मात्र कडकडीत ऊन राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. उगवण झालेल्या खरीप पिकांची भांगलण, कोळपण ही आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्याने आता पावसाची गरज होती. सोमवारी पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. दुपारी बारापर्यंत एकसारखी रिपरिप राहिली. त्यानंतर पाऊस कमी झाला. सायंकाळी पुन्हा पावसाने सुरुवात केली. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात ५२ मिलिमीटर इतका दमदार पाऊस झाला. त्यापाठोपाठ शाहूवाडी तालुक्यात २१, राधानगरी व चंदगड तालुक्यांत ९.६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात दमदार पाऊस सुरू असून राधानगरी धरणक्षेत्रात ३४, दूधगंगा परिसरात २९, कासारी ५०, कडवी १३, पाटगाव ६२, तर कुंभी धरणक्षेत्रात ९५ मिलिमीटर पाऊस चोवीस तासांत झाला आहे. पावसामुळे धरणांच्या पातळीत हळूहळू वाढ होत असून, नद्यांच्या पातळीतही वाढ झालेली दिसते. पंचगंगेतील पाण्याची पातळी चार फूट असून राजाराम बंधाऱ्याजवळील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सकाळपासून पाऊस सुरू झाल्याने थंड व आल्हाददायक वातावरण पसरले होते. पाऊस एकदाचा सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आजऱ्यात दमदार पाऊसआजरा : आजरा शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळिराजा सुखावला असून, शेतीकामांनी वेग घेतला आहे.रविवार रात्रीपासून पावसास सुरुवात झाली. पहाटेच्या दरम्यान सर्वत्र जोरदार पाऊस झाला. दिवसभर पाऊस पुन्हा पुन्हा हजेरी लावत होता. पावसाच्या या जोरदार हजेरीने शेतकरी वर्ग शेतीकामांत गुंतला आहे.पावसाच्या हजेरीने बाजारपेठेत बी-बियाणे, विक्रेते, रोपे विक्रेते, छत्री व पावसाळी साहित्य विक्रेत्यांनी गर्दी केली आहे. ऊस पिकासह इतर पिकांच्या दृष्टीने हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. चिकोत्रा खोऱ्यात पाऊसपांगिरे : चिकोत्रा खोऱ्यात सोमवारी सकाळपासून तुरळक पावसाने हजेरी लावल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. यावर्षी पाणीटंचाईमुळे खोऱ्यातील ऊस पिके ५० टक्के निघाली आहेत व भात, सोयाबीन, ज्वारी या पिकांवर येथील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. एकूणच चिकोत्रा खोऱ्यातील पेरण्या पूर्ण झाल्या असून, पिकांची उगवणही चांगली झाली आहे. त्यातच पावसाच्या उघडझापीमुळे कोळपण व भांगलण झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, आज सकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील पिकांना जीवदान मिळाले आहे. किणी परिसरात पावसामुळे शेतकरी आनंदीकिणी : किणी, घुणकी, वाठार परिसरात रविवारपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मान्सून पूर्व पावसाने पंधरा दिवसांपूर्वी आगमन करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. या पावसादरम्यान शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या मात्र, मान्सून पावसाने दडी मारल्याने दहा ते पंधरा दिवस पावसाचा पत्ताच नव्हता. शेतकरी हवालदिल झाले होते; तर पेरणी वाया जाण्याच्या मार्गावर येऊन ठेपली होती. त्यामुळे शेतकरी मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. रविवारपासून बारीक पावसाची संततधार सुरू झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, सुरू असलेल्या संततधारेमुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, पिकांना जीवदान लाभणार आहे.हातकणंगले परिसरात रिमझिमकुंभोज : रोहिणीसह मृग नक्षत्रातही पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. आर्द्राच्या नक्षत्राच्या प्रारंभीही पुरेसा पाऊस नसल्याने बळिराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. विशेषत: पुरेशा पावसाअभावी उसासह पेरक्षेत्रातील भात पिकाची वाढ खुंटली आहे. उशिरा का असेना पण दोन दिवसांपासून हातकणंगले तालुक्यात आर्द्रा नक्षत्रातील पावसाने रिमझीम सुरुवात केल्याने पिके तरारली आहेत. तथापि पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत ऊस पिकाच्या भरणीची कामे खोळंबली आहेत. अद्यापही सर्रास जमिनीत पुरेशी ओल न झाल्याने पेरणीसाठी शेतकरी दचकत पावले टाकत आहे. सर्वत्र मोठ्या पावसाचीच प्रतीक्षा दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप‘मान्सून सक्रिय : धरणक्षेत्रातही दमदार पाऊस, शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपुष्टात, बंधाऱ्याजवळ पाण्याचा विसर्ग वाढलाकोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू असून, बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांनी नि:श्वास सोडला आहे. गेले अनेक दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाने सोमवारी पहाटेपासून कोल्हापूर जिल्ह्णात हजेरी लावली आहे. शेजारील कोकणात गेले आठ दिवस जोरदार पाऊस सुरू असताना कोल्हापुरात मात्र कडकडीत ऊन राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. उगवण झालेल्या खरीप पिकांची भांगलण, कोळपण ही आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्याने आता पावसाची गरज होती. सोमवारी पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. दुपारी बारापर्यंत एकसारखी रिपरिप राहिली. त्यानंतर पाऊस कमी झाला. सायंकाळी पुन्हा पावसाने सुरुवात केली. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात ५२ मिलिमीटर इतका दमदार पाऊस झाला. त्यापाठोपाठ शाहूवाडी तालुक्यात २१, राधानगरी व चंदगड तालुक्यांत ९.६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात दमदार पाऊस सुरू असून राधानगरी धरणक्षेत्रात ३४, दूधगंगा परिसरात २९, कासारी ५०, कडवी १३, पाटगाव ६२, तर कुंभी धरणक्षेत्रात ९५ मिलिमीटर पाऊस चोवीस तासांत झाला आहे. पावसामुळे धरणांच्या पातळीत हळूहळू वाढ होत असून, नद्यांच्या पातळीतही वाढ झालेली दिसते. पंचगंगेतील पाण्याची पातळी चार फूट असून राजाराम बंधाऱ्याजवळील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. सकाळपासून पाऊस सुरू झाल्याने थंड व आल्हाददायक वातावरण पसरले होते. पाऊस एकदाचा सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आजऱ्यात दमदार पाऊसआजरा : आजरा शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने बळिराजा सुखावला असून, शेतीकामांनी वेग घेतला आहे.रविवार रात्रीपासून पावसास सुरुवात झाली. पहाटेच्या दरम्यान सर्वत्र जोरदार पाऊस झाला. दिवसभर पाऊस पुन्हा पुन्हा हजेरी लावत होता. पावसाच्या या जोरदार हजेरीने शेतकरी वर्ग शेतीकामांत गुंतला आहे.पावसाच्या हजेरीने बाजारपेठेत बी-बियाणे, विक्रेते, रोपे विक्रेते, छत्री व पावसाळी साहित्य विक्रेत्यांनी गर्दी केली आहे. ऊस पिकासह इतर पिकांच्या दृष्टीने हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. चिकोत्रा खोऱ्यात पाऊसपांगिरे : चिकोत्रा खोऱ्यात सोमवारी सकाळपासून तुरळक पावसाने हजेरी लावल्याने येथील शेतकरी सुखावला आहे. यावर्षी पाणीटंचाईमुळे खोऱ्यातील ऊस पिके ५० टक्के निघाली आहेत व भात, सोयाबीन, ज्वारी या पिकांवर येथील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. एकूणच चिकोत्रा खोऱ्यातील पेरण्या पूर्ण झाल्या असून, पिकांची उगवणही चांगली झाली आहे. त्यातच पावसाच्या उघडझापीमुळे कोळपण व भांगलण झाली आहे. त्यामुळे येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र, आज सकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील पिकांना जीवदान मिळाले आहे. किणी परिसरात पावसामुळे शेतकरी आनंदीकिणी : किणी, घुणकी, वाठार परिसरात रविवारपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मान्सून पूर्व पावसाने पंधरा दिवसांपूर्वी आगमन करून शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. या पावसादरम्यान शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या मात्र, मान्सून पावसाने दडी मारल्याने दहा ते पंधरा दिवस पावसाचा पत्ताच नव्हता. शेतकरी हवालदिल झाले होते; तर पेरणी वाया जाण्याच्या मार्गावर येऊन ठेपली होती. त्यामुळे शेतकरी मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. रविवारपासून बारीक पावसाची संततधार सुरू झाल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, सुरू असलेल्या संततधारेमुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, पिकांना जीवदान लाभणार आहे.हातकणंगले परिसरात रिमझिमकुंभोज : रोहिणीसह मृग नक्षत्रातही पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. आर्द्राच्या नक्षत्राच्या प्रारंभीही पुरेसा पाऊस नसल्याने बळिराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. विशेषत: पुरेशा पावसाअभावी उसासह पेरक्षेत्रातील भात पिकाची वाढ खुंटली आहे. उशिरा का असेना पण दोन दिवसांपासून हातकणंगले तालुक्यात आर्द्रा नक्षत्रातील पावसाने रिमझीम सुरुवात केल्याने पिके तरारली आहेत. तथापि पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत ऊस पिकाच्या भरणीची कामे खोळंबली आहेत. अद्यापही सर्रास जमिनीत पुरेशी ओल न झाल्याने पेरणीसाठी शेतकरी दचकत पावले टाकत आहे. सर्वत्र मोठ्या पावसाचीच प्रतीक्षा दिसून येत आहे.