कोल्हापूर : जिल्ह्यात दमदार सुरुवात केलेल्या वळीवाने शनिवारी रात्री अकरा नंतर झोडपून काढले. गुरुवारी झालेल्या पावसानंतर शुक्रवारी पावसाने विश्रांती घेतली होती. शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, रात्री अकराच्या दरम्यान जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचे आगमन झाले. विजांचा कडकडाट आणि ढगांचा जोरदार गडगडाट यामुळे वातावरण अधिकच भयावह वाटत होते. त्यात शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात वीजपुरवठा बंद झाला होता. शहरासह जिल्ह्यातील नृसिंहवाडी, शिरोळ, जयसिंगपूर, शिरोली एमआयडीसी, शिये, पारगाव आदी भागात मेघगर्जनेसह धुवाँधार पाउस झाल्याचे आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळविले आहे. या पावसाने एमआयडीसीतून घरी जाणाऱ्या रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांची धांदल उडाली.
कोल्हापूर जिल्ह्याला वळीवाच्या पावसाने झोडपले, वीज पुरवठा खंडीत
By admin | Updated: June 5, 2016 00:26 IST