शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात कधी जोरदार, तर कधी रिपरिप

By admin | Updated: September 1, 2014 23:04 IST

जिल्ह्यातील धरणे भरण्याच्या मार्गावर : गणेशोत्सव मंडळांच्या तयारीत व्यत्यय

कोल्हापूर : जिल्ह्यात एका दमात पुरेसा पाऊस झाल्यानंतरही तो थांबण्याची अद्यापही काही लक्षणे दिसत नाहीत. सायंकाळनंतर जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाची दिवसभर रिपरिप सुरू असते. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे आता भरण्याच्या मार्गावर आहेत. राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले असून, भोगावती व पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत भर पडत आहे. सध्या गणेशोत्सवातील रंग वाढत असतानाच रिपरिप पाऊस पडत असल्याने गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांच्या तयारीवर मर्यादा येत आहेत. गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती; परंतु गुरुवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळनंतर पावसाला सुरुवात होऊन रात्रभर तो सुरूच असतो. त्यामुळे विघ्नहर्त्या गणरायाचे आगमनही भरपावसात झाले. काल, रविवारी तर दिवसाही पाऊस पडत होता. आज, सोमवारी पावसाने थोडी उघडीप दिली. किरकोळ रिपरिप वगळता पावसाने आज विश्रांती घेतली होती; परंतु अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे गणेशोत्सव मंडळांच्या तयारीवर मात्र मर्यादा पडत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांची तारांबळ उडत आहे. यावर्षी चांगला पाऊस झाला असल्याने जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा, कडवी, वारणा, कुंभी, कासारी, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे, पाटगाव, तुळशी, चित्री, आदी धरणे जवळजवळ पूर्ण भरली आहेत. धरणक्षेत्रात आजही चांगला पाऊस होत आहे. भोगावती नदीवर असलेल्या राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे आज उघडलेलेच होते. सकाळी स्वयंचलित दरवाजा क्रमांक ३ व ६ उघडा होता, तर दुपारी तीन वाजता दरवाजा क्रमांक ५ हाही उघडला गेला. या धरणावरील पॉवर हाऊसमधून दोन हजार, तर स्वयंचलित दरवाजातून १४०० असे मिळून ३४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळीही काही प्रमाणात वाढली आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पातळी २८ फूट ४ इंच एवढी नोंदविली गेली. चोवीस तासांत दहा फुटाने ही पातळी वाढली आहे. राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक सध्या बंद आहे. (प्रतिनिधी)