शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या २७० कोटीच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅँक स्वीकारणार

By admin | Updated: February 18, 2017 21:20 IST

नोटाबंदीच्या काळात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा झालेल्या ५०० व १००० रूपयांच्या तब्बल २७० कोटी रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेकडून स्विकारण्याचा मार्ग मोकळा झाला.

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. १८ -  नोटाबंदीच्या काळात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा झालेल्या ५०० व १००० रूपयांच्या तब्बल २७० कोटी रूपयांच्या नोटा रिझर्व्ह बॅँकेकडून स्विकारण्याचा मार्ग मोकळा झाला. नाबार्ड ने ५० हजारापेक्षा अधिक जमा झालेल्या खात्यांची ‘केवासी’ पडताळणी केली, यामध्ये सगळ्या खात्यांची पुर्तता झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात बॅँकेत पडून असलेले पैसे बदलून देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यानंतर पहिल्या दोन-तीन दिवसात जिल्हा बॅँकेच्या १९१ शाखांत तब्बल २७० कोटीच्या जुना नोटा जमा झाल्या होत्या. रिझर्व्ह बॅँकेच्या सूचनेनुसार दोन लाखापेक्षा जास्त जमा झालेल्या खात्यांची यापुर्वीच तपासणी नाबार्ड ने केली होती. पण स्विकारलेले पैसे बदलून देण्यास रिझर्व्ह बॅँकेने काहीसी असमर्थता दर्शवल्याने जिल्हा बॅँकांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने ५० हजारापेक्षा अधिक जमा झालेल्या खात्यांची ‘केवायसी’ तपासणीनी करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते, त्यानुसार रिझर्व्ह बॅँकेने नाबार्डच्या माध्यमातून सोमवार पासून ‘केवायसी’ ची पडताळणी केली. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकार नंदू नाईक यांच्यासह सहा सदस्यांनी शुक्रवारी पडताळणीचे काम पूर्ण करून शनिवारी एकत्रीत अहवाल तयार केला.