शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

कोल्हापूर जिल्'ातील ४७२ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:06 IST

 : ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ५३ अर्ज दाखल : आज, उद्या अर्ज भरण्यासाठीलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्'ातील ४७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शुक्रवारी सुरू झाली. तालुक्याच्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी इच्छुक व समर्थकांची गर्दी झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी जिल्'ात थेट सरपंचपदासाठी ४१ उमेदवारांनी ४१ अर्ज दाखल केले; ...

ठळक मुद्देपहिल्या दिवशी सरपंचपदासाठी ४१ अर्ज दाखल

 

: ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ५३ अर्ज दाखल : आज, उद्या अर्ज भरण्यासाठीलोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्'ातील ४७२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी शुक्रवारी सुरू झाली. तालुक्याच्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी इच्छुक व समर्थकांची गर्दी झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी जिल्'ात थेट सरपंचपदासाठी ४१ उमेदवारांनी ४१ अर्ज दाखल केले; तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ५३ जणांनी ५३ अर्ज दाखल केले. सरपंचपदासाठी सर्वाधिक पन्हाळा तालुक्यात आठ अर्ज दाखल झाले. आज, शनिवार व उद्या, रविवारी सुटी असली तरी या दिवशी उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरता यावेत, यासाठी महा-ईसेवा केंद्रे व संग्राम केंद्रे सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक विभागाने दिले आहेत.जिल्'ातील ४७२ ग्रामपंचायतींसाठी १६ आॅक्टोबरला मतदान होत असून, १७ आॅक्टोबरला निकाल घोषित होणार आहे. याच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत हे अर्ज दाखल करण्यात येत होते. पहिलाच दिवस असल्याने अर्ज भरण्याबरोबरच उमेदवारी अर्ज कसे भरायचे याची माहिती घेण्यासाठी इच्छुकांसह समर्थकांनी निवडणूक कार्यालयांमध्ये गर्दी केली होती. अर्ज भरण्याची प्रक्रिया आॅनलाईन असल्याने, अर्ज भरून त्याची प्रिंट व त्यासोबत रहिवासी दाखला, संपत्ती विवरणपत्र, शौचालय असल्याचा दाखला, चारित्र्याचा दाखला, आदी कागदपत्रे निवडणूक अधिकाºयांकडे सादर केली जात होती. तालुक्याच्या ठिकाणी निवडणूक कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू होती.पहिल्या दिवशी जिल्'ात थेट सरपंचपदासाठी ४१ उमेदवारांनी ४१ अर्ज दाखल केले; तर ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ५३ उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले. यामध्ये सरपंचपदासाठी सर्वाधिक आठ अर्ज हे पन्हाळा तालुक्यात दाखल झाले. त्याखालोखाल गडहिंग्लजमध्ये सात, तर करवीर व हातकणंगलेमध्ये प्रत्येकी सहा अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी सर्वाधिक १३ उमेदवारी अर्ज करवीर तालुक्यात दाखल करण्यात आले.आज, शनिवार व उद्या, रविवारी सुटी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत; परंतु इच्छुकांच्या सोईसाठी त्यांना आॅनलाईनद्वारे अर्ज भरता यावेत, यासाठी या दोन्ही दिवशी महा-ई-सेवा केंद्रे व संग्राम केंद्रे सुरू ठेवावीत, असे आदेश जिल्हा निवडणूक विभागाद्वारे देण्यात आले आहेत.---------------------------------दाखल झालेले उमेदवारी अर्ज असेतालुका सरपंच सदस्यउमेदवार अर्ज संख्या उमेदवार अर्जसंख्याराधानगरी ४ ४ ८ ८कागल ० ० १ १करवीर ६ ६ १३ १३गगनबावडा ० ० ० ०आजरा ४ ४ ४ ४भुदरगड २ २ ० ०हातकणंगले ६ ६ ११ ११शिरोळ १ १ १ १शाहूवाडी ३ ३ ३ ३पन्हाळा ८ ८ ९ ९चंदगड ० ० ० ०गडहिंग्लज ७ ७ ३ ३ कोल्हापूर जिल्'ात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला शुक्रवारपासून सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी कोल्हापुरातील रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथील करवीर निवडणूक कार्यालयात अर्ज भरण्याबाबत इच्छुकांनी निवडणूक कर्मचाºयांकडून माहिती घेतली.