शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ‘ड’ वर्गातच

By admin | Updated: September 3, 2014 00:16 IST

नेत्यांनीच केला घात : कोट्यवधींच्या निधीला शहर मुकले

कोल्हापूर : शासनाने राज्यातील महापालिकांची वर्गवारी काल, सोमवारी जाहीर केली. अपेक्षित दरडोई उत्पन्न असूनही निव्वळ लोकसंख्येच्या निकषांस पात्र न ठरल्याने कोल्हापूरची महापालिका ‘ड’ वर्गातच राहिली आहे. लोकसंख्येचा निकष व वर्गवारीनुसारच राज्य व केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता होत असते. हद्दवाढीला राजकीय कारणास्तव ‘खो’ घातल्यानेच महापालिके ची वर्गवारी वाढू शकली नाही. शहर विकासाचा बळी नेत्यांनीच घेतल्याची चर्चा आहे.कोल्हापूर शहराची २०११ च्या जनगणनेसुसार पाच लाख ४९ हजार २८३ इतकी लोकसंख्या आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न एक लाख एक हजार ६२८ इतके आहे. मात्र, दहा लाख लोकसंख्येचा निकष पूर्ण करू न शकल्याने केंदाच्या जवाहरलाल नेहरू नागरी विकास योजनेअंतर्गत हजारो कोटींचा निधी मिळविण्यास शहर अपात्र ठरत आहे. महालक्ष्मी तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात राजकीय अपरिपक्वता सिद्ध होत असतानाच, दुसऱ्या बाजूला हद्दवाढ करून विशेष बाब म्हणून कोट्यवधींचा निधी आणण्याची संधीही राज्यकर्त्यांनी सोईच्या राजकारणासाठी घालविली. महापालिका ‘ड’ वर्गातच राहिल्याने केंद्र व राज्यांकडून मिळणाऱ्या अनेक योजनांच्या निधीसाठी वंचितच राहावे लागणार आहे. नाशिक व नागपूर महापालिकांना वर्गवारीत शासनाने विशेष बाब म्हणून वरच्या वर्गात घातले. कोल्हापूरचे नगरपालिकेतून महापालिकेत रूपांतर करताना लोक संख्येच्या निकषाला बगल देत राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर विशेष बाब म्हणून मंजुरी दिली होती. त्यावेळी राज्यातील ‘बेबी कार्पाेरेशन’ म्हणून शहराचा उल्लेख होई. अशीच राजकीय मुत्सद्दी नंतर कोणीही दाखविला नाही. हद्दवाढीच्या विरोधास राजकीय हवा मिळत आहे. नेत्यांच्या राजकारणामुळेच शहराचा बळी गेल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)वर्गवारीचे निकष‘अ’प्लस वर्ग- एक कोटी लोकसंख्या व ५० हजार दरडोई उत्पन्न‘अ’ वर्ग- २५लाख ते एक कोटी लोक संख्या व आठ हजारांपेक्षा अधिक दरडोई उत्पन्न‘ब’ वर्ग- १५ ते २५ लाख लोक संख्या व पाच हजारांपेक्षा अधिक दरडोई उत्पन्न‘क’ वर्ग- १० ते १५ लाख लोक संख्या व तीन हजारांपेक्षा अधिक दरडोई उत्पन्न‘ड’ वर्ग- तीन ते दहा लाख लोक संख्या