शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ई-फार्मसीजच्या निषेर्धात कोल्हापूरातील औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:09 IST

केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री व ई-फॉर्मासी धोरणाच्या विरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद पुकारला होता.या बंदमध्ये कोल्हापूरातील सर्वच औषध विक्रेत्यांनी सहभागी होत संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद पाळला.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले निवेदन ; आठशेहून अधिक व्यावसायिक सहभागीविशेष म्हणून मुकमोर्चा काढण्यात आला. औषध विक्रेत्यांच्या हाती दुष्परिणाम व निषेधाचे फलक होते.

कोल्हापूर : केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री व ई-फॉर्मासी धोरणाच्या विरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद पुकारला होता.या बंदमध्ये कोल्हापूरातील सर्वच औषध विक्रेत्यांनी सहभागी होत संपूर्ण दिवसभर कडकडीत बंद पाळला.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे औषधांची आॅनलाईन विक्री केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होवू शकतो. याबाबत जागरुकता आणण्यासाठी आॅल इंडिया आॅगनायझेशन आॅफ केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट(एआयओसीडी) या देशाच्या केमिस्टस् व वितरकांच्या शिखर संस्थेने भूमिका स्पष्ट केली होती. त्यानूसार शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या स्टेशनरोडवरील जिल्हा कार्यालयात एकत्र आले.

यावेळी स्टेशनरोड- असेंम्बली रोड - जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. तत्पुर्वी हा मोर्चाद्वारे उमा टॉकीज परिसरातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह संचालकांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले. यात जिल्ह्यातील आठशेहून अधिक विक्रेते सहभागी झाले होते. या धोरणाचा निषेध म्हणून काही विक्रेते काळे कपडे घालून सहभागी झाले होते. विशेष म्हणून मुकमोर्चा काढण्यात आला. औषध विक्रेत्यांच्या हाती दुष्परिणाम व निषेधाचे फलक होते.

जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहचल्यानंतर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी केले. यावेळी पदाधिकारी उपमहापौर महेश सावंत, शिवाजी ढेगे, राजकुमार छाबडा, प्रल्हाद खवरे, राहूल कारेकर, बलराम छाबडा, सचिन पुरोहीत, संजय शेटे, भरतेश कळंत्रे, निवास साळोखे, रवि जोशी, भुजंग भांडवले, आदी उपस्थित होते.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचल्यानंतर सहभागी झालेल्या आंदोलक औषध विक्रेत्यांना सेल्फीचा मोह काही केल्या आवरता आला नाही. अनेकांनी परिसरात उभे राहून मोबाईलद्वारे आपल्या छबी घेण्याची एकच घाई झाली होती. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या आंदोलकांना परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी बाहेर जाण्याची विनंती करीत होते. 

 केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री व ई-फॉर्मासी धोरणाच्या विरोधात देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी बंद पुकारला होता. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औषध विक्रेत्यांनी आंदोलन केले.(छाया : नसीर अत्तार ) 

 

टॅग्स :StrikeसंपMedicalवैद्यकीय