शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

कोल्हापूर बोर्ड बनले ‘आॅनलाईन’

By admin | Updated: January 10, 2015 00:21 IST

एका ‘क्लिक’वर माहिती : मुख्याध्यापक, लिपिकांना एसएमएस

संतोष मिठारी - कोल्हापूर -जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांत असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत परीक्षा, निकाल, आदींबाबतची परिपत्रके आता एका ‘क्लिक’वर मिळणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) कोल्हापूर विभागाने परिपत्रके ‘आॅनलाईन’ पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पहिली पायरी म्हणून विभागाचे संकेतस्थळ डिसेंबर २०१४ पासून सुरू केले आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांचा समावेश आहे. विभागीय मंडळाशी २ हजार ४०० शाळा आणि ६०० कनिष्ठ महाविद्यालये संबंधित आहेत. त्यांना परीक्षेचे अर्ज भरणे, वेळापत्रक पाठविणे, विविध बैठकांची माहिती देण्यासाठी तीन हजार परिपत्रिकांची छपाई करावी लागते. त्यानंतर संबंधित परिपत्रके पोस्टाद्वारे शाळा व महाविद्यालयांना पाठवावी लागतात. या प्रक्रियेत बराच वेळ, पैसा आणि श्रम वाया जातात. ते लक्षात घेऊन परिपत्रके आॅनलाईन पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी े२२ू.ुङ्मं१‘िङ्म’ँंस्र४१.्रल्ल हे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले आहे. त्याद्वारे परिपत्रके पाठविण्यात येतील. त्यासाठी शाळांचे ई-मेल तसेच मुख्याध्यापक, लिपिकांचे मोबाईल क्रमांक संकलित केले जात आहेत. परिपत्रके आॅनलाईन पाहण्याची शाळांना सवय व्हावी यासाठी वर्षभर त्यांना ‘एसएमएस’ पाठविले जातील.मोजक्या सूचनांची यंदा अंमलबजावणी!दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका लवकर द्यावी, विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळील परीक्षा केंद्र द्यावे, अशा सूचना केल्या आहेत. या परीक्षांसाठी महिना उरला आहे. अशा स्थितीत मंत्री तावडे यांनी केलेल्या सूचनांपैकी ज्या शक्य होतील, त्यांचीच अंमलबजावणी यंदा होणार आहे. सूचनांच्या अंमलबजावणीचा निर्णय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या समितीवर अवलंबून असणार आहे.बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च, तर दहावीची परीक्षा ३ मार्च ते २६ मार्चदरम्यान होणार आहे. प्रश्नपत्रिकांची छपाई पूर्ण झाली असून, केंद्राची निश्चिती, संचालक, शिक्षक, आदींच्या बैठकींची तयारी शिक्षण मंडळाकडून सुरू आहे. शिक्षक विद्यार्थी सराव, पूर्वपरीक्षा तसेच प्रात्यक्षिकांच्या तयारीत गुंतले आहे. यातच शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात शिक्षणमंत्री तावडे यांनी विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये विविध सूचना सुचविल्या आहेत. यातील घराजवळील परीक्षा केंद्र देणे यंदा प्रत्यक्षात शक्य होणार नसल्याचे परीक्षाविषयक तसेच शिक्षणक्षेत्राशी संबंधित काही लोकांनी सांगितले. शिवाय, प्रश्नपत्रिका दहा मिनिटे आधी देण्याची अंमलबजावणी करता येईल. पण, विद्यार्थांना आणखी किमान अर्धा तास वर्गात घ्यावे लागणार आहे. त्याचा परिणाम पेपरचा कालावधी वाढण्यावर होणार असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. यापूर्वी परिपत्रके पाठविण्यात बराच वेळ लागायचा; त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना याबाबत काही शंका, अडचणी असल्यास त्यांच्या सोडवणुकीसाठी विलंब होत होता. शिवाय एक परिपत्रक पाठविण्यास किमान दहा रुपयांचा खर्च व्हायचा. वर्षभरात विभागाचा परिपत्रकांवरील खर्च लाखोंच्या घरात पोहोचत होता. सर्वच शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये संगणक आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे परिपत्रके आॅनलाईन पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याभरात ही प्रक्रिया सुरू होईल.- शरद गोसावी, सचिव, कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळशिक्षणमंत्र्यांनी केलेल्या सूचना विद्यार्थिहिताच्या आहेत. संबंधित सूचना शिक्षण मंडळाच्या विविध समित्यांसमोर ठेवण्यात येतील. त्यातील निर्णयानुसारच या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. परीक्षांसाठी अवघा महिना राहिला आहे. त्यामुळे समितीची बैठक लवकरच घेण्यात येईल. त्यातील निर्णय लवकरच जाहीर केले जातील.- गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य मा.व उ.मा.शिक्षण मंडळ