शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर रणांगण तापले

By admin | Updated: September 27, 2014 00:11 IST

सतेज पाटील : पाठिंबा देऊन ‘शब्द’ पाळला - जातीयवादी प्रवृत्तींना थारा नाही-- समरजितसिंह घाटगे : हसन मुश्रीफ

जातीयवादी प्रवृत्तींना कागलमध्ये थारा नाही-- समरजितसिंह घाटगे : हसन मुश्रीफ यांचा उमेदवारी अर्ज दाखलकागल : राजर्षी शाहू महाराजांची ही भूमी आहे. जातीयवादी प्रवृत्तींना थारा न देण्याचा कागलचा इतिहास आहे. कागलच्या जनतेला २४ तास उपलब्ध असणारा आमदार हवा आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार हवा आहे. विक्रमसिंहराजे आणि मुश्रीफ-पाटील आघाडी म्हणजे विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन शाहू दूध संघाचे समरजितसिंह घाटगे यांनी केले.येथील बापूसाहेब महाराज चौकात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित भव्य रॅलीच्या सांगता सभेत घाटगे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार निवेदिता माने होत्या. उमेदवार हसन मुश्रीफ, रणजितसिंह पाटील, भैया माने, दत्तामामा खराडे, सुनील सूर्यवंशी, युवराज पाटील, राजेंद्र जाधव, बॉबी माने, मनोहर पाटील, वसंत्कार्यकर्ता हवा की पाहुणा..?सतेज पाटील : लोकसभेवेळी पाठिंबा देऊन ‘शब्द’ पाळला कोल्हापूर : मतदारसंघाचा कायापालट करणारा व तुमच्या प्रश्नांसाठी राबणारा कार्यकर्ता हवा की, निवडणुका लागल्यावर रिंगणात उतरलेला २० दिवसांचा पाहुणा उमेदवार हवा, अशी रोखठोक विचारणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज, शुक्रवारी येथे केली. मी जनतेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. त्याची परतफेड येत्या निवडणुकीत तुमचे बहुमोल मत देऊन करा, असे आवाहन पाटील यांनी केले. कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीसह उत्साही वातावरणात शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आयोजित प्रचार प्रारंभाच्या सभेत ते बोलत होते. कळंबा रोडवरील तपोवन मैदानावरील काँग्रेसमय वातावरणातील सभेस माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, प्रल्हाद चव्हाण, डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष संजय डी. पाटील, शांतादेवी पाटील, प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.एकाच दिवशी ६८ उमेदवारांचे अर्ज कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता शुक्रवारचा सुमुहूर्त साधत आज जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह ६८ जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांवर छाप पाडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांनी केलेल्या जोरदार शक्तिप्रदर्शनाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून गेले. कोल्हापूर शहरासह तालुक्याची गावे आज जनसागराच्या गर्दीने फुलून गेली. जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात चौरंगी, पंचरंगी निवडणूक होत असल्याने आतापासूनच निवडणुकीला रंग भरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत. दहाही मतदारसंघांत जोरदार लढती होणार आहेत, याची प्रचिती आज उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या शक्तिप्रदर्शनातून आली. विशेषत: कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर व कोल्हापूर उत्तर, राधानगरी मतदारसंघांत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शनावर भर दिला होता. विविध प्रकारच्या वाहनांतून कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्यांना आणण्यात आले होते. कार्यकर्त्यांच्या दिमतीला मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा दिल्यामुळे सर्वत्र वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते.