शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर आणि डॉ. बाबासाहेब

By admin | Updated: April 13, 2016 23:38 IST

छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांची पहिली भेट

कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या अस्पृश्यांच्या चळवळीत सुशिक्षित अस्पृश्य तरुण होते. दत्तोबा संतराम पोवार हे त्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावायचे. छत्रपती शाहू महाराजांचे ते अतिशय निष्ठावंत सहकारी होते. दत्तोबा पोवार यांचा १९१७ साली आंबेडकर यांच्याशी परिचय झाला. डॉ. आंबेडकरांच्या शिक्षणामुळे पोवार भारावून गेले. त्यांनी ही माहिती शाहू महाराजांना दिली. अस्पृश्य समाजातील तरुणाने इतके शिक्षण घेतले आहे, हे ऐकून शाहू महाराजांना अपार आनंद झाला अन् लगेचच त्यांनी डॉ. बाबासाहेबांशी ओळख करून द्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. १९१९ मध्ये डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी शाहू महाराज मुंबईला गेले. आंबेडकर परळमधील चाळीत राहात होते. कोल्हापूरचे राजे आपल्याला भेटण्यासाठी आले आहेत, असा निरोप मिळताच दुसऱ्या मजल्यावरून ते खाली आले आणि महाराजांना भेटले. महाराजांनी बाबासाहेबांना ते उतरलेल्या पन्हाळा लॉजवर नेले. या ठिकाणी दोघांमध्ये झालेल्या चर्चेत महाराजांनी आंबेडकरांना कोल्हापूर भेटीचे निमंत्रण दिले. बाबासाहेबांनी हे निमंत्रण स्वीकारले.दलित प्रजा परिषद खासबाग मैदानावर ३० डिसेंबर १९३९ रोजी दलित प्रजा परिषद घेण्यात आली होती. तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर होते. या दिवशी रिसाल्याजवळ त्यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर तिथून डॉ. आंबेडकर यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर अधिवेशनास प्रारंभ झाला. दलित प्रजा परिषदेत झालेले ठराव छत्रपती राजाराम महाराजांना देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी त्यांची भेट घेतली. परिषदेतील ठराव त्यांच्यासमोर मांडले. यावेळी राजाराम महाराजांनी त्यांना या ठरावांच्या कामी योग्य ते लक्ष देण्याचे आश्वासन दिले. डॉ. आंबेडकर यांना राजवाड्यावर भोजनाची अनेक निमंत्रणे राजाराम महाराजांनी दिली होती. इतका या दोघांतील स्नेहभाव घट्ट होता. खासबाग मैदान येथील प्रजा परिषदेनिमित्त कोल्हापुरात आल्यानंतर दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यास डॉ़ आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला़ याप्रसंगी बी़ एच़ वराळे, गंगाराम कांबळे, मसू लिगाडे, थळू बेळे-सातार्डेकर, शांताराम सरनाईक, केरू बनगे, आबा सरनाईक, खोडा गंगाराम, संभाजी भातवे, रामचंद्र अंबपकर, दादासाहेब शिर्के, यशवंत सुळगावकर, आदी.डॉ. आंबेडकरांची कोल्हापूरची शेवटची भेटराजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात भाषण देण्याच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर २४ आणि २५ डिसेंबर १९५२ रोजी कोल्हापुरात आले. कोल्हापूरकरांसाठी ही त्यांची भेट शेवटची ठरली; कारण त्यानंतर ते कोल्हापुरात येऊ शकले नाहीत.