शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोल्हापूर : विमानसेवा अजूनही ‘हवेत’च

By admin | Updated: November 12, 2014 00:17 IST

नुसताच ताकतुंबा : ‘डीजीसीए’ चाचणी होणार कधी ?

कोल्हापूर : लोकप्रतिनिधींचा पुढाकार, उद्योजक-व्यावसायिकांची तयारी, राज्य शासनाकडील पूर्ण झालेली प्रक्रिया, पर्यावरण, सुरक्षा आदी स्वरुपांतील आवश्यक असलेली ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) मिळून दोन महिने उलटले, तरी कोल्हापूरच्या विमानसेवेचा प्रारंभ अजूनही ‘हवेत’च आहे.गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी जूनमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेत मुंबईतील सुप्रीम एव्हिएशन कंपनीचे अधिकारी आणि कोल्हापुरातील उद्योजक, व्यावसायिकांची बैठक घेतली. त्यात ‘सुप्रीम’ने कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी नियमित, कमी आसन क्षमतेची विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर १५ आॅगस्टला विमानसेवा सुरू करण्याचा मुहूर्त निश्चित केला. त्यानुसार ‘सुप्रीम’ने सेवा देण्यासाठीच्या विविध प्रकारच्या तीस मंजुरी, परवानगी आॅगस्ट अखेरपर्यंत मिळविल्या तसेच राज्य शासनाच्या पातळीवरील सर्व प्रक्रियाही पूर्ण केली. मात्र, नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून ‘एनओसी’ मिळण्यास विलंब झाल्याने विमानसेवा प्रारंभ लांबणीवर पडला. खासदार महाडिक आणि ‘सुप्रीम’च्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने हालचाली करून विविध ‘एनओसी’ मिळविल्या. मात्र, विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या तीस मंजुरी, परवानगी आणि एनओसी मिळविल्यानंतर केवळ ‘डीजीसीए’च्या चाचणी घेण्याच्या प्रक्रियेत कोल्हापूरची विमानसेवा अडकून पडली आहे. (प्रतिनिधी)‘डीजीसीए’च्या चाचणीबाबत केंद्रीयमंत्री गजपती राजू यांची या आठवड्यात दिल्लीला गेल्यानंतर भेट झाली नाही. २० नोव्हेंबरनंतर पुन्हा त्यांच्या भेटीसाठी जाणार असून याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. विमानसेवा सुरू करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. - धनंजय महाडिक, खासदार ‘जेट एअरवेज’कडून चाचपणी!देशभरात विमानसेवा पुरविणाऱ्या ‘जेट एअरवेज’कडून कोल्हापूरमध्ये विमानसेवा पुरविण्याबाबतची चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात संबंधित कंपनी कोल्हापूरचे ‘पोटेनशियल’ तसेच उद्योजक-व्यावसायिकांना किती तिकीट दर, विमानाची वेळ कशी असावी याबाबतची माहिती संकलित करत आहे. त्यासाठी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, गोशिमा, स्मॅक आदी उद्योजकीय संघटनांची पत्रे घेतली जात आहेत.‘ओनरशिप’मध्ये अडकली चाचणी?‘डीजीसीए’कडून एनओसी मिळाल्यानंतर कोल्हापूरची विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कंपनीच्या माध्यमातून सेवा पुरविण्यात येत असतील, तरच ‘डीजीसीए’ अशा स्वरूपातील चाचणीची प्रक्रिया पूर्ण करते. सध्या कोल्हापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नात असलेले एव्हिएशन ही ‘ओनरशीप’ पद्धतीतील असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कदाचित ‘डीजीसीए’च्या चाचणीला विलंब होत असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.हे अडथळे दूर व्हावेतविमानतळावरील ‘नेव्हिगेशन गेज’ तयार नाहीत. कारपेट एरिया योग्य स्वरूपातील नाही. कंपन्यांना अपेक्षित असल्याप्रमाणे रन-वे तयार नाही. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सुविधा थकबाकीमुळे कोल्हापूर महानगरपालिका देण्यास तयार नाही. अशा स्वरूपातील अडथळे दूर होणे विमानसेवेच्या लवकर प्रारंभ होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत.विमानतळाची वाटचाल१९७६ : विमानतळाची सुरुवात१९७९ ते २०१२ : विमानसेवा अधिकतरवेळा बंदच१९९३ : विमानतळविस्तारीकरणाची चर्चा१९९९ : ‘राईट’ कन्सल्टन्सीने विस्तारीकरणाबाबतचाअहवाल दिला२००८ : भूसंपादनाच्या तिढ्यामुळे विस्तारीकरण रखडले२०१० : भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण२०११ : खराब धावपट्टीमुळे विमानसेवा बंद२०१२ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे भाडेतत्त्वावर असलेल्या विमानतळाची (एमआयडीसी) मुदत संपली२०१३ : राज्य मंत्रिमंडळात एमआयडीसीकडून प्राधिकरणाकडे विमानतळ हस्तांतरणाचा निर्णयजून २०१४ : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरूआॅगस्ट २०१४ : कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर विमानसेवेसाठी ‘सुप्रीम’ने मिळविल्या ३० ‘एनओसी’