शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांसाठी कोल्हापूरचा विमान लई भारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 20:29 IST

सातारा : पर्यटनाबरोबरच कार्यालयीन कामासाठी हवाईसफर करणाºया सातारकरांना पुण्याच्या ट्रॅफिकपेक्षा सुसाट कोल्हापूरचे विमानतळ अधिक भावले, अशी माहिती ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

ठळक मुद्दे ‘ट्रॅफिक जाम’ हीच मोठी समस्यापर्यटनाबरोबरच, देवदर्शन आणि कार्यालयीन कामासाठी होतेय हवाईसफरकोल्हापूरला हवाईसेवा सुरू झाल्यावर कोल्हापुरातील पाहुणे शोधण्याची वेळ सातारकरांवर येणार आहे.

सातारा : पर्यटनाबरोबरच कार्यालयीन कामासाठी हवाईसफर करणाºया सातारकरांना पुण्याच्या ट्रॅफिकपेक्षा सुसाट कोल्हापूरचे विमानतळ अधिक भावले, अशी माहिती ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

कोल्हापूर-मुंबई विमान सेवा पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली आहेत. विमानसेवा सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून आॅपरेटिंग लायसन्स मिळविण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर विमानतळावरून मुंबईसाठी हवाई सेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाल्याने सातारकरांना विमानाने प्रवास करण्यासाठी कोल्हापूर सोपे का पुणे, याविषयी ‘लोकमत’ने सर्व्हे केला.

सातारा-पुणे आणि सातारा-कोल्हापूर हे अंतर सुमारे ११० किलोमीटरचे आहे. कोल्हापूर आणि पुण्याचे अंतर एकसारखे असले तरीही कात्रज घाट ओलांडल्यानंतर पुणे शहरात विमानतळापर्यंत पोहोचायला कमीत कमी एक तासाचा वेळ लागतो. त्यातही कार्यालय सुरू आणि बंद होण्याच्या वेळेत तर विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी दोन तास लागतात. प्रवास आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे कोल्हापूर विमानतळाकडे सातारकरांचा ओढा असणार हे नक्की!विमान प्रवास कशासाठीगेल्या काही वर्षांत सातारकरांचा विमानाचा प्रवास वाढल्याचा दिसतो. वर्षातून एकदा पर्यटनाच्या निमित्ताने सहकुटुंंब विमान प्रवास करण्याची मानसिकता सातारकरांमध्ये वाढू लागली आहे. मुलांच्या सुट्या आणि पालकांच्या उद्योग व्यवसायाचा ताळमेळ बसवून या सुट्यांचे नियोजन केले जाते. तीन महिने आधी विमानाचे तिकीट काढल्याने रेल्वेच्या प्रथम श्रेणीतील प्रवासा इतका खर्च वाचतो. रेल्वेने दोन-तीन दिवसांचा प्रवास करण्याऐवजी विमानाने अवघ्या दोन तासांत प्रवास होत असल्याने त्याला पसंती दिली जाते.पार्किंगसाठी कोल्हापुरी पाहुण्यांचा शोध !प्रत्येक विमानतळावर पार्किंगची व्यवस्था आहे. पण येथे गाडी पार्क करायला तासाच्या हिशेबाने दर घेतला जातो. त्यामुळे विमानतळावर पार्किंग करण्याकडे प्रवाशांचा ओढा नसतो. विमानतळाबाहेरच गाड्या लावून आपल्या फ्लाईटची प्रतीक्षा करणं याकडे अनेकांचा कल असतो. अनेक सातारकरांचे पाहुणे पुण्यात राहतात. त्यामुळे ज्यांना विमानाने प्रवास करायचा आहे आणि गाडीही पुण्यातच ठेवायची आहे. ते पुण्यातील पाहुण्यांची मदत घेतात आणि गाडी त्यांच्या ताब्यात देतात. कोल्हापूरला हवाईसेवा सुरू झाल्यावर कोल्हापुरातील पाहुणे शोधण्याची वेळ सातारकरांवर येणार आहे.विमानप्रवासाचा एकूण खर्च!सातारा-पुणे चारचाकीने प्रवास करायचा म्हटलं तर बाराशे ते दीड हजार रुपयांचा खर्च येतो. तिथून पुढे विमाननगरला जायचे म्हटले की, शे-पाचशे रुपये वाढीव. हाच प्रवास सातारा-कोल्हापूर करायचा म्हटलं तर बाराशे-तेराशे रुपयांमध्ये होऊ शकतो. कोल्हापूरचे विमानतळ मुख्य रस्त्यावरच असल्याने येथे जाताना अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत नाही. विमानाचे तिकीट सरासरी अडीच हजार आणि विमानतळापर्यंतचा प्रवास खर्च सरासरी एक सारखाच येतो.