शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात ‘आप’ची हलगी कडाडली

By admin | Updated: February 11, 2015 00:15 IST

विजयाचा जल्लोष : भाजप-काँग्रेसचा ‘झाडू’ने सफाया झाल्याच्या प्रतिक्रिया

कोल्हापूर : दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर ‘भाजप-काँग्रेसचा ‘झाडू’ने पराभव,’ अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त झाली. कोल्हापुरातही चहा टपरीपासून सरकारी कार्यालयांपर्यंत आणि बसथांब्यापासून चौका-चौकांतही दुपारपर्यंत लोक दिल्लीत काय झाले, याची चौकशी करत होते. तरुण मंडळांच्या फलकांवरही ‘आप’च्या निकालाचे वृत्त झळकल्याचे दिसले. कोल्हापुरात मंगळवारी दुपारी बिंदू चौकातून कार्यकर्त्यांनी रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी लाडू वाटले. ढोल-ताशांचा गजर, केजरीवाल यांचे फलक व पक्षाचे चिन्ह असलेला ‘झाडू’ घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जिल्हा संयोजक नारायण पोवार, आनंद वणिरे, नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, सचिन द्राक्षे, आदम शेख, संदीप देसाई, इलाही शेख, सुजाता पाटील, आदींचा सहभाग होता.जनतेच्या जोरावर ‘आप’ने दिल्लीत एकहाती व निर्विवाद सत्ता मिळविली. भारतीय जनता पक्षाने पैशांच्या जोरावर सत्ता घेण्याचा प्रयत्न केला पण, तो मतदारांनी उधळून लावला. - नारायण पोवार, जिल्हा संयोजक, आपगेल्या आठ महिन्यांत भाजपच्या परिघावर असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांची घरवापसी तसेच अन्य बाबींतील आततायीपणा या निवडणुकीत नडला आहे. - डॉ. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक‘आप’च्या माध्यमातून देशात दमदार विरोधी पक्षाचा उदय झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील नाराजी या निकालातून स्पष्ट झाली. - डॉ. प्रकाश पवार, राजकीय अभ्यासकभारतीय मतदारांनी चाणाक्षपणा दाखवून दिला. उन्मत्तपणे कोणी वागू नये, हा धडा दिल्लीच्या निकालातून दाखवून दिला आहे. - गोविंद पानसरे, ज्येष्ठ कामगार नेतेदिल्लीत भाजपचा पराभव झाला असला तरी मतांची टक्केवारी कमी झालेली नाही. प्रत्येक राज्यातील स्थिती वेगवेगळी असते. पराभवाचे आत्मचिंतन भाजपचे वरिष्ठ नेते करतील.- महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप, कोल्हापूर