शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

कोळेकर कुटुंबीयांना मदतीचा ओघ सुरू

By admin | Updated: February 28, 2017 00:56 IST

मंडलिकांकडून मुलांचा शैक्षणिक खर्च : समरजित घाटगे, धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी ५० हजारांची मदत

मंडलिकांकडून मुलांचा शैक्षणिक खर्च : समरजित घाटगे, धनंजय महाडिक यांच्याकडून प्रत्येकी ५० हजारांची मदत मुरगूड : येथील बाजारपेठेत गुरुवारी मध्यरात्री कोळेकर कापड दुकान व राहत्या घरास आग लागून धनंजय व प्रियांका कोळेकर या पती-पत्नीचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यांची मुले रोहित व ज्ञानेश्वरी आणि त्यांच्या आजी-आजोबांचे सांत्वन करण्यासाठी सोमवारी विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी पन्नास हजारांची तातडीची मदत जाहीर केली आहे. शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पन्नास हजारांची मदत, तर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी रोहित आणि ज्ञानेश्वरीच्या सर्व शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. समाजातील सर्व थरांतून कोळेकर, मडिलगेकर व रानमाळे कुटुंबीयांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे.रोहितने शिक्षण घेतानाच आपला व्यवसायही सांभाळावा, यासाठी त्यांचे दुकान उभे करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करू, असे आश्वासनही यावेळी धनंजय महाडिक यांनी दिले असून, पंतप्रधान सहायता योजनेतून जास्तीत जास्त निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर समरजित घाटगे यांनीही आपण तातडीने पन्नास हजार रुपयांची मदत देत असल्याचे सांगून कोळेकर यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधूनही आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. प्रा. संजय मंडलिक यांनी शिक्षणाचा खर्च आपण उचलत असल्याचे सांगून कोळेकर यांचे घर बांधताना लागेल ती मदत करण्याचे अभिवचन दिले. यावेळी स्मरजित यांच्याबरोबर नवोदिता घाटगे, दत्तामामा खराडे, सुनील सूर्यवंशी, विलास गुरव, अमर चौगले, रामभाऊ खराडे, सुहास मोरे, विष्णू मोरबाळे, तर महाडिकांसोबत संदीप भारमल, दिग्विजय पाटील, प्रा. चंद्रकांत जाधव, बटू जाधव, राजू चव्हाण, विनायक भोसले, सतीश लोंढे, शशांक चौगले, रणजित भारमल, राहुल वंडकर, राजू आमते, तर मंडलिकांसोबत वीरेंद्र मंडलिक, नगराध्यक्ष राजेखान जमादार, जयसिंग भोसले, नामदेवराव मेंडके, आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)या मान्यवरांनी केली मदतसाई मंडळ, ओंकार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून फिरून मदत गोळा केली. त्यामध्ये नगराध्यक्ष राजेखान जमादार ११ हजार, माजी नगरसेवक सुहास खराडे ११ हजार, नगरसेवक नामदेवराव मेंडके ५ हजार, विनय कुलकर्णी ५ हजार, बाळासाहेब सूर्यवंशी ५ हजार, समीर हळदकर ५ हजार, प्रवीण सूर्यवंशी ५ हजार, उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले ५ हजार, बाळूमामा भिशी मंडळ ५ हजार, नवमहाराष्ट्र मंडळ ५० हजार, ओंकार मंडळ २५ हजार, सुपरहिट मंडळ २५ हजार, व्यापारी असोसिएशन १० हजार, शाहू पतसंस्था ५ हजार, गणेश पतसंस्था ५ हजार, व्यापारी पतसंस्था ५ हजार, लक्ष्मी नारायण पतसंस्था ५ हजाराची मदत केली.याबरोबरच साईबाबा मंडळ व वादळ ग्रुप घराच्या बांधकामासाठी लागणारे दीड लाखांचे वीट वाळू हे साहित्य, इमारतीसाठी फॅब्रिकेशन, रुफकामासाठी अनिल मगदूम, प्रवीण दाभोळे यांनी जबाबदारी घेतली आहे. वायरिंगसाठी विजय सापळे यांनी, संसारोपयोगी साहित्य जोतिराम सूर्यवंशी यांनी तर अपंग असोसिएशनने किराणा साहित्य देण्याचे सांगितले.