शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी जीवनासाठी ज्ञान, कौशल्ये आवश्यक

By admin | Updated: December 30, 2014 00:05 IST

एन. जे. पवार : महावीर महाविद्यालयात विद्यापीठाची छात्रसभा

कोल्हापूर : यशस्वी जीवनासाठी ज्ञान, कौशल्ये, दृष्टिकोन व आत्मविश्वास ही चतु:सूत्री आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आज, सोमवारी येथे केले.महावीर महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित छात्रसभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव महावीर देसाई, तर प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ‘बीसीयुडी’ संचालक डॉ. ए. बी. राजगे प्रमुख उपस्थित होते.डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठाचे विविध उपक्रम विद्यार्थ्यांना माहीत व्हावेत. विद्यार्थ्यांच्या समस्या अडचणी विद्यापीठापर्यंत पोहोचविण्यात व त्याचे लगेच निराकरण व्हावे या उद्देशाने छात्रसभा घेण्यात येते. त्यात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी येथील माहिती संकलित करून आपल्या महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावी.देसाई म्हणाले, विद्यापीठाच्या छात्रसभेमुळे विद्यार्थी आणि विद्यापीठ यांच्यातील समन्वय वाढणार आहे. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष पंकज मोरे, सचिव श्वेता परुळेकर, आदींची भाषणे झाली. यावेळी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संभाजीराव कणसे यांनी स्वागत केले. संध्या जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अरुण पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)शुल्क माफीच्या अर्जांचे वितरणविद्यार्थी कल्याण मंडळाची सचिव श्वेता परुळेकर हिने शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ व्हावे यासाठी विद्यापीठ व शासनपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी आवश्यक माहिती संकलनासाठी आजच्या छात्रसभेवेळी तिने अर्जांचे वितरण केले. प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनीला तिने पाच अर्ज दिले आहेत. या अर्जांद्वारे संकलित झालेल्या माहितीच्या आधारावर पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचे पत्रकाद्वारे सांगितले आहे. तांत्रिक मुद्द्यांवरून विद्यापीठाच्या अधिसभेत शुल्कमाफीचा विषय नाकारणे दुर्दैवी असल्याचेदेखील तिने पत्रकात म्हटले आहे.कोल्हापुरात सोमवारी महावीर महाविद्यालयातील छात्रसभेचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. एन. जे. पवार. शेजारी महावीर देसाई, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, ए. बी. राजगे, डॉ. दीपाली काळे, डी. आर. मोरे, संभाजीराव कणसे, डी. के. गायकवाड, पंकज मोरे, श्वेता परुळेकर, अरुण पाटील, अक्षय कांबळे उपस्थित होते.