शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

कळे येथे महिलेवर चाकू हल्ला

By admin | Updated: August 25, 2015 00:06 IST

अज्ञाताचे कृत्य : महिलांचा चार तास रास्ता रोको; हल्लेखोर पकडण्याची मागणी

कळे : जनावरांच्या गोठ्यात धार काढण्यासाठी गेलेल्या वंदना आनंदा पाटील (वय ४२) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला करून पोबारा केला. कळेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यासंबंधी कळे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर फिर्याद नोंदविली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वंदना पाटील यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस जनावरांचा गोठा आहे. सकाळी सुमारे सव्वासातच्या दरम्यान त्या म्हैशीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेल्या. घरात दोन लहान मुले होती. धार काढून दुधाची किटली घेऊन उठत असतानाच अज्ञात व्यक्तीने वंदना यांना दोन-तीन थप्पड मारल्या. अचानक घडलेल्या या प्रकाराने त्या बेशुद्ध पडल्या. यावेळी हल्लेखोर व्यक्ती पसार झाली. हनुवटीवर चाकू हल्ला झाल्याचे लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांना उपचारासाठी कळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. ही बातमी पन्हाळा पश्चिम भागांसह धामणी खोऱ्यात पसरली आणि सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत सर्व गावांतून शासन आणि पोलिसांविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी वंदन यांच्या हल्लेखोरांना तत्काळ शोधून काढावे म्हणून कळे पोलीस ठाण्याच्या दारात ठिया आंदोलन केले. पोलिसांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जमावाने कळे दस्तुरीवर रास्ता रोको आंदोलन केले. गगनबावडा, कोल्हापूर, बाजार भोगाव विभागांतील वाहने थांबविली. हे चक्का जाम आंदोलन सुमारे चार तास सुरू होते. यावेळी चोरटे, हल्लेखोर यांचा बंदोबस्त करावा, अशा घोषणा जमावाकडून येत होत्या. यावेळी पन्हाळ््याचे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, कळेच्या सहायक पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. लोकांनी सुरक्षेबाबत कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केल्यानंतर आंदोलक शांत झाले.