इचलकरंजी : पूर्वीचा रा. मनात धरून येथील जुना चंदूर रोड परिसरातील एकावर चाकूने वार करून खुनी हल्ला केला. यामध्ये श्रीकांत मोहन भोई (वय २८, रा. जुना चंदूर रोड) हे जखमी झाले. याप्रकरणी सुनील साताप्पा माने (रा. कबनूर, ता. हातकणंगले) याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीकांत व सुनील हे बालपणीचे मित्र आहेत. श्रीकांत हा वाहिफणी कामगार आहे, तर सुनील हा एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामास आहे. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या भांडण्याचा राग मनात धरून बुधवारी (दि.१६) दुपारी चारच्या सुमारास सुनील याने श्रीकांत यांच्या गळ्यावर वार करून त्यांना जखमी केले. श्रीकांत यांच्यावर आयजीएम रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.