शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

केएमटी कर्मचारीही वडाप विरोधात रस्त्यावर

By admin | Updated: April 9, 2017 00:43 IST

शनिवारी दिवसभर बिंदू चौक, लुगडी ओळ, मध्यवर्ती बसस्थानक (समाधान थांबा) या प्रमुख थांब्यांवर थांबून वडाप रिक्षांना पिटाळून लावले.

कोल्हापूर : आर. टी. ओ. कार्यालयाकडून शहरातील वडाप विरोधात कारवाई सुरूझाल्यानंतर आता ‘केएमटी’चे कर्मचारीही वडापला आळा घालण्याकरिता रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारी दिवसभर शहरातील काही प्रमुख मार्गावरील बसथांब्यावर वडाप रिक्षांना कर्मचाऱ्यांनी पिटाळून लावले. दरम्यान, वडाप बंद होत असल्यामुळे केएमटीच्या उत्पन्नात दिवसात दीड लाखांची जादा भर पडली. शहरातील वडाप रिक्षा वाहतुकीमुळे केएमटीची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे परिवहन समिती सभापती नियाज खान यांनी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार यांच्यासह सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांची भेट घेतली होती. वडाप करणाऱ्या सर्व प्रकारच्या रिक्षा तसेच सहा आसनी रिक्षांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. शुक्रवारी एकच दिवस प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली. शनिवारी सुटी असल्याने कारवाई झाली नाही; परंतु केएमटीचे कर्मचारीही आता रस्त्यावर उतरले असून, त्यांनी शनिवारी दिवसभर बिंदू चौक, लुगडी ओळ, मध्यवर्ती बसस्थानक (समाधान थांबा) या प्रमुख थांब्यांवर थांबून वडाप रिक्षांना पिटाळून लावले. केएमटी प्रशासनाने पन्नास मीटर अंतराच्या आत रिक्षा थांबा असू नये म्हणून बस थांब्यावर पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. केएमटीचे दैनंदिन उत्पन्न साडेसात लाख रुपयांपर्यंत खाली आले होते; पण वडाप बंद करण्यात आल्यामुळे दोन दिवस ते साडेआठ लाखांपर्यंत पोहोचले आहे. (प्रतिनिधी)