शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

केएमटी निविदेचा फेरविचार होणार

By admin | Updated: August 7, 2014 00:21 IST

समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी ‘लोकमत’ला दिली.

कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन विभागाकडे (के.एम.टी.) घेण्यात येणाऱ्या १०४ बसेसचा पुरवठा करण्यासाठी दुसऱ्यांदा काढलेली निविदा रद्दबादल करीत पुन्हा निविदा काढण्याचा निर्णय परिवहन समितीने घेतला. मात्र, ही निविदा प्रक्रिया विधानसभा आचारसंहितेमध्ये अडकण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासनाने फेरविचारार्थ ती पुन्हा समितीकडे पाठविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी ‘लोकमत’ला दिली.केंद्र सरकारने के.एम.टी.ला १०४ नव्या बसेस घेण्यासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. बसेसचा कर भरण्यासाठी लागणारी साडेचार कोटींच्या रकमेच्या उभारणीचा प्रश्न के.एम.टी.समोर होता. नुकत्याच झालेल्या महासभेने के.एम.टी.ला कर्ज उभारणीस मंजुरी दिली. के.एम.टी.ने दुसऱ्यांदा काढलेल्या निविदेत तीन कंपन्या तांत्रिक निकषांवर पात्र ठरल्या. टाटा मोटर्स (२४.७२ लाख), अशोक लेलँड (२४.६३ लाख) व व्ही. व्ही. कमर्शियल व्हेईकल्स (२५.२२ लाख) (कंसातील दर प्रतिबसप्रमाणे) बसेस पुरवठा करण्यास इच्छुक होत्या. सर्वांत कमी निविदा दर आलेल्या अशोक लेलँड कंपनीला बस पुरविण्याचा ठेका देण्याबाबतचा निर्णय प्रशासन स्तरावर झाला. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत पुन्हा निविदा प्रक्रिया घेण्याचे ठरले. देशपातळीवर या चारच कंपन्या बसेस निर्माण करण्यात आघाडीवर आहेत. निविदा व केंद्र शासनाने घातलेल्या अटी पूर्ण करण्याची क्षमता या कंपन्यांमध्येच असल्याने पुन्हा याच कंपन्यांची निविदा भरली जाण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. निविदा प्रक्रियेत सर्वांत कमी निविदा दर आलेल्या अशोक लेलॅँड कंपनीला निविदा मंजुरीचे पत्र देण्याची तयारी सुरू असतानाच समितीने खो घातल्याची चर्चा आहे. फेरनिविदेचा विचार व्हावा, यासाठी प्रशासन पुन्हा समितीकडे हा विषय मांडणार आहे. देण्याघेण्यावरून लांबलेल्या निविदा प्रक्रियेचा निर्णय येत्या दोन दिवसांत लागण्याची शक्यता आहे. फेरनिविदा काढण्याचा निर्णय झाल्यास बसखरेदी किमान सहा महिन्यांसाठी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे के.एम.टी.चे दुखणे वाढतच जाणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)