शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

केएमटी बस चालकावर गुन्हा, चार दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 18:29 IST

गंगावेश परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत भरधाव केएमटी बस घुसवुन दोघांना चिरडून अठरा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल झाला. याप्रकरणी संशयित राजाराम पांडुरंग पाटील (वय ४७, रा. सडोली म्हाळुंगे, ता. करवीर) याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यासंबधी विपुल चंद्रकांत पाटील ( २५, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी, २ री गल्ली) यांनी फिर्याद दिली.

ठळक मुद्देचालकाच्या बेफिकीरपणामुळे हा अपघात झाल्याची चर्चा ‘आरटीओ’च्या ताब्यात बस‘आरटीओ’च्या तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणारजुना राजवाडा पोलीस ठाण्यात बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

कोल्हापूर : गंगावेश परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत भरधाव केएमटी बस घुसवुन दोघांना चिरडून अठरा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात सोमवारी दाखल झाला. याप्रकरणी संशयित राजाराम पांडुरंग पाटील (वय ४७, रा. सडोली म्हाळुंगे, ता. करवीर) याला अटक केली. न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यासंबधी विपुल चंद्रकांत पाटील ( २५, रा. मातंग वसाहत, राजारामपुरी, २ री गल्ली) यांनी फिर्याद दिली.

अधिक माहिती अशी, शहरात रविवारी सर्वत्र भक्तिमय वातावरणात ताबूत विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. राजारामपुरीतील मातंग वसाहतीमध्ये तानाजी साठे यांच्या हजरत दस्तगीर बदामी पंजाची ताबूत विसर्जन मिरवणूक पापाची तिकटी ते गंगावेश मार्गे जात असताना मार्केटयार्डहून लक्षतीर्थ वसाहतीकडे निघालेली केएमटी बस मिरवणूकीत घुसली अन कल्लोळ माजला. त्यामध्ये बसखाली चिरडून तानाजी भाऊ साठे (५०), सुजल भानुदास अवघडे (१५, रा. राजारामपुरी तिसरी गल्ली, मातंग वसाहत, कोल्हापूर) यांचा दूर्देवी मृत्यू झाला. तर अठरा भाविक गंभीर जखमी झाले. यावेळी संतप्त जमावाने बससह अग्निशामक दलाच्या बंबची तोडफोड केली.

या घटनेचे गांर्भीय लक्षात घेत पोलीसांनी विपुल पाटील याची फिर्याद घेवून बस चालक रंगराव पाटील याचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर करुन बसचा नेमका अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. अपघाताचे दूष्य गंभीर होते. त्यामुळे चालक मद्यप्राशन करुन होता. की बसमध्ये तांत्रिक बिघाड होती, याचा तपास करण्यासाठी आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी न्यायालयासमोर केली. त्यावर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

‘आरटीओ’च्या अहवालानंतर कारण स्पष्टबसचा ब्रेक निकामी होवून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. परंतू तसा काही प्रकार झाला नसल्याचेही बोलले जाते. चालकाच्या बेफिकीरपणामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार बसमध्ये नेमकी काय बिघाड झाला आहे, यासंबधीचे निष्कर्ष काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग (आर. टी. ओ) यांच्या ताब्यात बस दिली आहे. तेथील तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे.