शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

के.एम.टी.चे शिलकी अंदाजपत्रक

By admin | Updated: March 22, 2017 01:02 IST

तोटा कसा भरुन काढणार ? : करवीर दर्शन, वायफाय सेवा सुरू करण्याचा संकल्प

कोल्हापूर : दररोज दोन-अडीच लाख रुपयांनी तोट्यात धावणाऱ्या के.एम.टी.चे नवीन वर्षाचे एक लाख ३४ हजारांचे शिलकी अंदाजपत्रक मंगळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांनी परिवहन समितीला सादर केले. शहरात महिलांकरिता खास २५ बसेस सुरू करण्याचा त्याचबरोबर करवीर दर्शन बससेवा, प्रवासी वर्गाकरिता वायफाय सेवा सुरू करण्याचा संकल्प या अंदाजपत्रकात करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी मंगळवारी झालेल्या परिवहन समिती सभेत के.एम.टी. उपक्रमाचा सन २०१७-१८चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा सादर केला. यावेळी प्रभारी अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. नवीन अंदाजपत्रकीय आराखड्यात अव्वल शिलकेसह महसुली जमा ६९ कोटी ७९ लाख ०४ हजार आणि महसुली खर्च ६९ कोटी ७७ लाख ७० हजार असा १ लाख ३४ हजार शिलकी अंदाज तर भांडवली जमा १० कोटी ७१ लाख ५० हजार ४४३ रुपये व भांडवली खर्च १० कोटी ३५ लाख असा ३६ लाख ५० हजार ४४३ रुपयांचा शिलकी अंदाज अपेक्षित धरण्यात आला आहे. नवीन अंदाजपत्रकात महापालिकेकडून वार्षिक १४.८५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी प्रत्येक महिन्याला सव्वा कोटी रुपयांचे अनुदान के.एम.टी.ला देण्यात येईल, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत फक्त महिलांसाठी २५ बसेसद्वारे विशेष बससेवा सुरू करणार. एमटीडीसीच्या सहकार्याने दोन करवीर दर्शन बसेस सुरू करणार. बसेसच्या वेळापत्रकाचा काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार. यंत्रशाळा विभागाकडे सोलर पॉवरचा प्रकल्प उभारण्यात येणार. इंधन मायलेजसाठी आॅटोमेशन आॅफ फ्युएल सिस्टीम कार्यान्वित केली जाणार. मोबाईल अ‍ॅपद्वारे प्रवासी नागरिकांना बसमार्ग व वेळापत्रकाची माहिती देणार. मोबाईल अ‍ॅपद्वारे पहिल्या तीन महिन्यांत पास खरेदी करणाऱ्यांना १५ टक्के सवलत देणार. पाच प्रमुख वाहतूक नियंत्रण केंद्रांवर मोफत ‘वायफाय’ सुविधा देण्याचे नियोजन. उत्पन्नवाढीसाठी प्रयत्नच नाहीतके.एम.टी. सध्या आर्थिक तोट्यात चालते. उत्पन्नवाढीसाठी ठोस उपाययोजना करण्याच्या अपेक्षा होत्या, परंतु प्रशासनाकडून तसे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे के.एम.टी. समोरील आर्थिक संकट कसे दूर होणार? की आहे तशीच के.एम.टी. चालणार याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. अंदाजपत्रकातील तरतुदीही जुन्याच असून त्या मागील पानावरून पुढे घेण्यात आलेल्या आहेत. महिलांसाठी २५ बसेस