शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

सोलापूरजवळ अपघातात किर्लोस्करवाडीचे दोघे ठार

By admin | Updated: February 27, 2016 00:43 IST

तीन वाहनांचा अपघात : आणखी दोघे सोलापूरचे

कुरुल : सोलापूर-मंगळवेढा या राज्य रस्त्यावरील कामती बुद्रुक गावाजवळ गुरूवारी (दि़ २५) रात्री अकराच्या सुमारास तीन वाहनांची धडक होऊन आयशर टेम्पोतील बॅटरीच्या स्पार्कमुळे पेटलेल्या आगीत चार जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला़ यात आणखी एक जण गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली़ या भीषण अपघातात आयशर टेम्पोतील यासीन इकबाल नदाफ (वय २६, रा़ किर्लोस्करवाडी, ता़ पलूस, जि़ सांगली), रमजान तुराबुद्दीन चौगुले (रा़ रामानंदनगर, किर्लोस्करवाडी), पिकअपमधील दरेप्पा ईश्वरप्पा हत्ताळी (वय २७, रा़ हुलजंती, ता़ मंगळवेढा) अशा तिघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर टिपरचा चालक सोमनाथ भीमशा कोडके (वय ३८) व पिकअपमधील समाधान दिगंबर भोपळे हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले होते़ तेथे उपचारादरम्यान टिपरचालक सोमनाथ कोडके याचा मृत्यू झाला़ या अपघातासंदर्भात कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास पिकअप (क्रमांक एमएच १३ ए़एऩ ४११५) वाहन सोलापूर मार्केटमध्ये डाळिंब उतरवून मंगळवेढ्याकडे निघाले होते़ तर सांगलीकडून द्राक्ष भरून आयशर टेम्पो (क्ऱ एमएच १४ सीपी ५७४८) सोलापूरकडे निघाला होता़ कामतीजवळ खराडे वस्तीनजीक आल्यानंतर आयशर टेम्पो चालकाचा ताबा निसटल्याने त्याने पिकअपला समोरून जोराची धडक दिली़ या धडकेने पिकअप वाहन ५ ते १० फूट फेकले गेले़ याचवेळी सोलापूरहून वाळू वाहतूक करणारा हायवा टिपर (क्र. एमएच १३ एएक्स ३५७८) च्या चालकास काहीच अंदाज न आल्याने टिपर-आयशर टेम्पोची जोरात धडक बसली़ दरम्यान, या जोराच्या धडकेने आयशर टेम्पोतील बॅटरीने पेट घेतल्याने ठिणगी पडली़ या ठिणगीचे रुपांतर टेम्पोत पॅकिंग द्राक्षासाठी असलेल्या कागदाने घेतला़ त्यामुळे आगीने रुद्ररूप धारण केले़ जवळपासच्या वस्तीवरील लोकांनी पोलीस स्टेशनला कळविल्यानंतर तत्काळ सहायक पोलीस निरीक्षक संजीव झाडे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली़ गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ भीमा साखर कारखाना व सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली़ या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे, सपोनि संजीव झाडे, पोकॉ हांडे, वाकडे, कांबळे, सलबत्ते, चमके, बोधवड, मोरे, गायकवाड, शिवसेना तालुका उपप्रमुख अशोक भोसले आदींनी घटनास्थळी भेट दिली़