शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत बालिका सांगलीत सापडली

By admin | Updated: August 31, 2014 23:25 IST

मुंबईतून पळविले : विजापूरच्या महिलेस अटक

सांगली : तीन दिवसांपूर्वी मुंबईतून यास्मिन इस्माईल शेख या नऊ महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणाचा छडा आज, रविवार सांगलीत लागला. बालिका सुखरूप सापडल्याने मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. तिचे अपहरण करणाऱ्या भाग्यश्री संतोष पाटील (वय ३५, रा. विजापूर, कर्नाटक) या महिलेस अटक करण्यात आली आहे. सायंकाळी या चिमुरडीची आई सलमा शेख व गुन्हे अन्वेषणचे पथक सांगलीत दाखल झाले होते. पथकाने मुलीचा ताबा तिच्या आईकडे दिला. भाग्यश्रीला ताब्यात घेऊन पथक रात्री उशिरा मुंबईला रवाना झाले.सलमा शेख या मुंबईतील गिरगावमध्ये मच्छी गल्लीतील पत्र्याच्या चाळीत राहतात. त्यांची मुलगी यास्मिन ही २९ आॅगस्टला घराजवळ खेळत होती. संशयित भाग्यश्रीही तिथेच राहते. दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत यास्मिनचे अपहरण झाले होते. सलमा यांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कोठेच सापडली नव्हती. त्यामुळे रात्री उशिरा त्यांनी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हे अन्वेषण विभागानेही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना संशयित भाग्यश्रीही गायब असल्याचे समजले होते. त्यांनी यास्मिन व भाग्यश्रीचे छायाचित्र राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवून शोधाचे आदेश दिले होते. विश्रामबाग पोलिसांनाही हे छायाचित्र मिळाले होते. आज, रविवार सकाळी गोकुळनगरमध्ये एक महिला लहान मुलाला घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस तिथे तातडीने रवाना झाले. त्यांच्याकडे असलेल्या फोटोवरून ही महिला भाग्यश्री पाटीलच असल्याचे समजले. तिच्यासोबत यास्मिनही होती. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. भाग्यश्रीची कसून चौकशी करण्यात आली. वर्षांपूर्वी ती गोकुळनगरमध्ये राहत होती. त्यानंतर ती मुंबईला गेली होती. यास्मिनचे तिने का अपरहण केले, यासंदर्भात ती काहीही बोलत नाही. या कारवाईची माहिती मिळताच मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)सोलापूर, पुणे, जेजुरी अन् सांगलीयास्मिनचे अपहरण केल्यानंतर भाग्यश्री मुंबईतून सोलापूरला गेली. त्यानंतर पुणे व जेजुरीलाही गेली होती. काल, शनिवार रात्री ती रेल्वेने सांगलीत आली. रेल्वे स्टेशनवरून थेट ती गोकुळनगरमध्ये गेली. रात्रभर तिने तिथेच मुक्काम ठोकला.