शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

खेड, इचलकरंजी आघाडीवर नगराध्यक्ष सुवर्णचषक व्हॉलिबॉल

By admin | Updated: February 15, 2015 23:50 IST

व्हॉलिबॉल स्पर्धेची पहिली फेरी रविवारी घेण्यात आली. त्यावेळी पाच नगरपरिषदांच्या संघांत सामना झाला

विटा (जि. सांगली) : विटा नगरपरिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या फेरीत व्हॉलिबॉल सामन्यात घाटंजी (जि. यवतमाळ), अचलपूर, खेड, इचलकरंजी व हिंगोली नगरपरिषदेच्या संघांनी आघाडी घेतली. व्हॉलिबॉल स्पर्धेची पहिली फेरी रविवारी घेण्यात आली. त्यावेळी पाच नगरपरिषदांच्या संघांत सामना झाला.या व्हॉलिबॉल स्पर्धेत पहिल्या फेरीचा सामना घाटंजी विरुद्ध श्रीवर्धन यांच्या संघात झाला. हा सामना घाटंजी (यवतमाळ) संघाने जिंंकला. त्यानंतर इचलकरंजी विरुद्ध बदलापूर यांच्यातील सामना इचलकरंजीने जिंकला. खोपोली विरुद्ध हिंगोली यांच्यातील सामना हिंगोली पालिकेच्या संघाने, राजापूर विरुद्ध अचलपूर यांच्यातील सामना अचलपूरच्या संघाने आणि खेड विरुद्ध अंबाजोगाई यांच्यातील व्हॉलिबॉल सामना खेड नगरपरिषदेच्या संघाने जिंकून पहिल्या फेरीत आघाडी घेतली.यावेळी नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रिकेट स्पर्धाही झाली. पहिल्या फेरीत रविवारी पेठवडगाव, पंढरपूर, मानवत, परभणी, पनवेल, रत्नागिरी, दापोली, तासगाव, तातडी, बदलापूर, इचलकरंजी, कऱ्हाड, वाई, खेड, कुरुंदवाड, पूर्णा, फलटण या नगरपरिषदेच्या संघांनी क्रिकेट सामन्यात आघाडी घेतली. खो-खो स्पर्धेत फलटण विरुद्ध विटा यांच्यातील सामना विटा पालिकेच्या संघाने जिंकला, तर कबड्डी सामन्यात इस्लामपूर, तासगाव, मनमाड, हिंगोली, पाथरी व खेड नगरपरिषदेच्या संघांनी पहिल्या फेरीत विजयी सलामी दिली. राज्यस्तरीय नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रीडा स्पर्धेमुळे विटा शहर क्रीडामय झाले आहे. (वार्ताहर)