कोल्हापूर : १९७४ सालापासून छोटे व्यावसायिक, वाहतूकदार, गवंडी, मजूर यांच्यासाठी कार्यरत असणाऱ्या भिशीचे २५ वर्षांपूर्वी खासबाग अर्बन सोसायटीत रूपांतर झाले. त्यातून संस्थेने छोट्या लोकांची आर्थिक पत निर्माण केल्याने आज त्यांना मोठ्या बँका मोठी आर्थिक मदत करतात, असे गौरवोद्गार शाहू छत्रपती यांनी काढले.
मंगळवार पेठे, खासबाग परिसरातील खासबाग अर्बन-को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा २५ वा रौप्यमहोत्सवी सोहळा शाहू छत्रपती यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कडक नियमावलीमुळे छोट्या व्यावसायिकांना राष्ट्रीयीकृत बँका कर्ज देऊ शकत नाहीत; पण अशांना छोट्या सोसायट्या तातडीने अर्थसाहाय्य करतात. त्यामुळे छोट्या सोसायट्या टिकविण्यासाठी समाजाने हातभार लावावा.
यावेळी खासदार मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव यांनीही सोसायटीच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक व स्वागत चेअरमन अशोक पोवार यांनी केले, तर यशवंत वाळवेकर यांनी आभार मानले. यावेळी हिंदकेसरी पै. दिनानाथसिंह, उद्योजक व्ही. बी. पाटील, प्रा. जयंत पाटील, माजी महापौर महादेवराव आडगुळे, संस्थापक चेअरमन केशव पोवार, राजेंद्र खुडे, प्रदीप काटकर, आदींसह आजी-माजी संचालक, सभासद उपस्थित होते.
फोटो नं. २१०८२०२१-कोल-खासबाग
ओळ : मंगळवार पेठेतील खासबाग अर्बन-को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा २५ वा रौप्यमहोत्सवानिमित्त शाहू छत्रपती व पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अशोक पोवार, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, प्रा. जयंत पाटील, आदी उपस्थित होते.
210821\21kol_1_21082021_5.jpg
ओळ : मंगळवार पेठेतील खासबाग अर्बन-को-ऑप.क्रेडीट सोसायटीचा २५ वा रौप्यमहोत्सवानिमीत्त शाहू छत्रपती व पालकमंत्री सतेज पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अशोक पोवार, खासदार संजय मंडलीक, आमदार चंद्रकांत जाधव, प्रा. जयंत पाटील आदी उपस्थित होते.