पावसाने दांडी मारली, त्याचा परिणाम खरीप हंगामावर झाला. पाऊस नसल्याने पिके माना टाकू लागली. मृग नक्षत्रातील रासायनिक खतांचा ऊस पिकांना डोस दिलेल्या ऊस क्षेत्राला पावसाची गरज आहे. करवीर तालुका पश्चिम माळरान, डोंगर परिसर, खडकाळ जमिनीमधील शेतीतील ऊस पिके आता करपू लागली आहेत.
पाऊस नसल्यामुळे डोंगरी भागातील भात रोपे वाळू लागली आहेत. भोगावती, तुळशी नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. पिकांना पाऊस नसल्यामुळे शेतीतील मशागतीची कामे थांबली आहेत.
एकीकडे कोरोनाची धास्ती, तर दुसरीकडे खरीप पिके वाळू लागल्याची भीती, अशा दुहेरी संकटाला बळीराजाला सामोरे जावे लागत आहे.