शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

खरीप क्षेत्रात नऊ हजार हेक्टरची वाढ

By admin | Updated: May 8, 2017 00:55 IST

खरीप क्षेत्रात नऊ हजार हेक्टरची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील खरिपाच्या क्षेत्रात तब्बल नऊ हजार हेक्टरची वाढ झाली आहे. साखर कारखान्यांचा लवकर संपलेला हंगाम, रब्बीच्या वाढलेल्या क्षेत्राचा एकंदरीत परिणाम म्हणून यंदा खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. भात, खरीप ज्वारीच्या क्षेत्रात वाढ दिसत नसली तरी भुईमूग, सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात कमालीची वाढ दिसत आहे. गत हंगामात पाणीटंचाईमुळे उसाचे क्षेत्र घटले. खरिपाचे २ लाख ५७ हजार ४०० हेक्टरचे उद्दिष्ट होते. त्यापैकी २ लाख ४२ हजार ३०० हेक्टरवर पेरणी झाली. उसाचे क्षेत्र १ लाख ४१ हजार ९०० हेक्टर होते. यामध्ये ९ हजार आडसाली, ३५ हजार पूर्वहंगामी, तर ३९ हजार सुरूची लागण होती. जवळपास ५८ हजार हेक्टरवर खोडवा पीक होते. दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा कारखाने तीन-साडेतीन महिनेच चालले. हंगाम लवकर संपल्याने रब्बीचे क्षेत्र वाढले. रब्बी काढल्याने आता त्या जमिनी खरिपाखाली आल्या आहेत. कृषी विभागाने या खरीप हंगामासाठी १ लाख ११ हजार ३०० हेक्टरचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे. गतवर्षीपेक्षा नऊ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. यामध्ये भुईमूग १६०० हेक्टर, सोयाबीन २४००, तूर १४००, मूग ७००, उडीद १७००, तर नागलीचे ८०० हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. भाताचे १ लाख १० हजार तर खरीप ज्वारीचे ४० हजार हेक्टर क्षेत्र मात्र कायम आहे. उसाच्या क्षेत्रातही फारसा बदल झाला नसून, १ लाख ४१ हजार हेक्टरवर उभा ऊस आहे. दृष्टिक्षेपात खरीप हंगाम प्रमुख पिकेसर्वसाधारण क्षेत्रउद्दिष्ट हेक्टरभात१,०८,000१,१०,000ज्वारी७,२००४,000नागली२१,४००२२,५००मका२,८००३,५००तुर२,५००३000मुग२,३००२, ७००उडीद२,५०० ३,५००भुईमूग५२,१००५३,७००सोयाबीन५१,७००५६,000ऊस१,४२,३००१,४१,९००