शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

खंडोबा तालीमची विजयी सलामी

By admin | Updated: February 11, 2016 23:40 IST

छत्रपती शहाजी महाराज वरिष्ठ गटाच्या फुटबॉल स्पर्धा

कोल्हापूर : दिलबहार तालीम मंडळातर्फे आयोजित छत्रपती शहाजी महाराज वरिष्ठ गटाच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये गुरुवारी खंडोबा तालीम फुटबॉल संघाने संध्यामठ तरुण मंडळावर ट्रायब्रेकरवर ३-१ अशा गोलफरकाने मात करीत विजयी सलामी दिली. शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, माजी नगरसेवक विनायक फाळके, रमेश पुरेकर, ‘केएसए’चे पदाधिकारी उपस्थित होते. उद्घाटनचा सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम फुटबॉल संघ यांच्यामध्ये झाला. प्रारंभापासून संध्यामठ तरुण मंडळाने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. १७ व्या मिनिटाला संध्यामठच्या अक्षय पाटीलने गोल नोंदवीत संघाला १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ही आघाडी कमी करण्यासाठी खंडोबाच्या अजिज मोमीन, तुषार पाटील, सागर पोवार, ओमकार साळवी यांनीे प्रयत्न केले. मात्र त्यांच्या चढाया फोल ठरल्या. सामन्याच्या ७८ व्या मिनिटाला खंडोबाच्या सिद्धार्थ शिंदे याने गोल नोंदवीत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. ही बरोबरी सामना संपेपर्यंत कायम राहिल्याने मुख्य पंचांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेतला. यामध्ये खंडोबा तालीम संघाकडून सागर पोवार, रोहन पाटील, आशिष चव्हाण यांनी गोल केले; तर तुषार पाटीलने मारलेला चेंडू पोलला लागला. संध्यामठ तरुण मंडळाकडून आशिष पाटील, सिद्धेश यादव यांनी मारलेला चेंडू खंडोबा संघाचा गोलरक्षक निखिल दर्पण याने अडविला. रोहित साठेने गोल केला, तर मंगेश भालकरने मारलेला चेंडू बाहेर गेला. अशा प्रकारे खंडोबा तालीम मंडळाने सामन्यात ३-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला.