शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

खामकरवाडी पाझर तलावास गळती

By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST

शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर : तलावाच्या मुख्य दरवाजातून लाखो लिटर पाणी वाया

धामोड : खामकरवाडी लघू पाटबंधारे तलावात पाणी साठविण्याच्या दिवसापासून लवकर भरणारा व लवकर आटणारा अशी ख्याती असलेला हा पाझर तलाव जल संधारणाच्या बेपर्वाईमुळे समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. पावसाळ्यापूर्वी धरणातील दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर काढण्यासाठी तलावाचा मुख्य दरवाजा उघडण्यात आला; पण हा दरवाजा अर्धवट स्थितीत अडकल्याने व पूर्ण बंद न झाल्याने तलावाच्या मुख्य दरवाजातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तलावाची पाणीपातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. परिणामी, शेती सिंचनाचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे येथील शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. तेव्हा संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन या मुख्य दरवाजाची गळती काढावी, अन्यथा येथील शेतकऱ्यांवर पाणीटंचाईची कुऱ्हाड कोसळेल.तुळशी व धामणी खोऱ्याच्या मध्यवर्ती खामकरवाडी येथे ‘खडकीचा ओढा’ येथे कै. अंबाजी बा. खामकर (गुरुजी) व माजी आमदार संपतराव पवार-पाटील (बापू) यांच्या विशेष प्रयत्नातून खामकरवाडी, अवचितवाडी दरम्यान ११६२.७८ सहस्त्र घ. मी. इतकी पाणी साठवण करणाऱ्या तलावाची निर्मिती २००० साली झाली; पण मुळातच या प्रकल्पाचे काम निकृष्ट झाल्याने हा प्रकल्प अनेक समस्यांच्या विळख्यात सुरुवातीपासूूनच सापडत गेला. त्यामुळे दरम्यानच्या कालावधीत हा प्रकल्प ‘असून अडचण अन् नसून खोळंबा’ अशा स्थितीत येऊन ठेपला; पण असे असले तरी १४ ते १५ वेळा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असूनदेखील वारंवार लागलेल्या गळतींमुळे तो लवकरच आटत होता. परिणामी एप्रिल, मे दरम्यान पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. या प्रकल्पामध्ये १६.३१ हेक्टर इतके क्षेत्र बुडीत गेले असले, तरी १९५ हेक्टर इतक्या क्षेत्राला यामधील पाण्याचा लाभ होतो आहे. या धरणाची लांबी २०४ मीटर इतकी असून, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर तलावाच्या उजव्या बाजूस असणाऱ्या खामकरवाडीकडील सांडव्यातून प्रतिसेकंद १४५.९० घ. मी. इतक्या पाण्याचा विसर्ग होत असतो; पण यावर्षी तलावाच्या मुख्य दरवाजाला लागलेल्या गळतीमुळे गेल्या १४ वर्षांत जुलै संपला, तरी हा तलाव अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. संबंधित विभागाने याकडे तत्काळ लक्ष देऊन दरवाजाची गळती काढावी, अन्यथा धरण कोरडे पडण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त हेत आहे.