शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

केळोशी बुद्रुकचा लोंढा - नाला प्रकल्प तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST

श्रीकांत ऱ्हायकर लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : ...

श्रीकांत ऱ्हायकर

लोकमत न्यूज नेटवर्क

धामोड : गेल्या चार दिवसांपासून तुळशीसह धामणी परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने येथील ५६०३.२२५ सहस्र घनमीटर साठवण क्षमता असलेला मध्यम प्रकल्प बुधवारी सायंकाळी तुडुंब भरला. सद्या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, अतिरिक्त पाणी या कालव्याद्वारे थेट तुळशी जलाशयात मिसळत आहे. परिणामी तुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून, तुळशी धरण भरण्यास मदत होणार आहे.

बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर तरण्या पावसाच्या नक्षत्राने दमदार हजेरी लावली आहे. परिसरात चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाअभावी खोळंबलेली रोप लावणीची कामे वेग घेत आहेत. केळोशी प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी तुळशी तलावात मिसळत असल्याने तुळशीचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. चार दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने अर्धवट भरलेला हा प्रकल्प बुधवारी सायंकाळी पूर्ण क्षमतेने भरला. येथील बैलगोंड ओढ्यावर हा प्रकल्प अस्तित्वात आला असून, या प्रकल्पामुळे केळोशी, जाधववाडी, सुतारवडी, वळवंटवाडी, कुंभारवाडी, कुरणेवाडी, देऊळवाडीसह छोटया-मोठया वाड्या-वस्त्यांचा शेती सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे.

तुळशी धरण परिसरात २४ तासांत ५७ मि.मीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणात सद्या ४७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. गतसाली आजआखेर धरण परिसरात ९५३ मि.मी. इतका पाऊस नोंदवला होता .चालू वर्षी यात वाढ होऊन हा आकडा ११६९ मिमी. इतका झाला आहे; पण पावसाच्या प्रमाणात वाढ झाली असली तरी गतसालपेक्षा धरणात यावर्षी ३ टक्के पाणी कमी असल्याचे जाणवते आहे.

फोटो ओळी - केळोशी बु. (ता. राधानगरी) येथील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, अतिरिक्त होणारे पाणी तुळशी जलाशयात मिसळत आहे.

छाया - श्रीकांत ऱ्हायकर