शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
5
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
6
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
7
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
8
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
9
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
10
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
11
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
12
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
13
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
14
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
15
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
16
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
17
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
18
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
19
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
20
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?

गुणवंत विद्यार्थी निर्माणासाठी कार्यरत राहावे

By admin | Updated: November 18, 2014 23:33 IST

जी. डी. यादव : शिवाजी विद्यापीठाचा ५२ वा वर्धापनदिन साजरा; गुणवंतांचा सत्कार

कोल्हापूर : जगात गुणवत्तेला पर्याय नाही आणि असे गुणवान विद्यार्थी निर्माण करण्यासाठी विद्यापीठाने कार्यरत राहावे. नवीन ज्ञानाची निर्मिर्ती हा कोणत्याही विद्यापीठाच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू असतो आणि त्याची पूर्तता शिक्षक, विद्यार्थी, प्रशासकीय सेवक आणि माजी विद्यार्र्थी या चार प्रमुख स्तंभांच्या सक्षमतेवर अवलंबून असते. या चार स्तंभांची एकत्र सांगड घातल्यास विद्यापीठाची वाटचाल योग्य प्रकारे होते, असे प्रतिपादन माटुंगा (मुंबई) येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू प्रा. जी. डी. यादव यांनी आज, मंगळवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापनदिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार होते. विद्यापीठाच्या राजर्र्षी शाहू सभागृहात बोलताना यादव म्हणाले, ज्या विद्यापीठात शिक्षक उत्कृष्ट काम करीत असतात, ज्ञानसंपन्न असतात, त्यांचा लौकिक वृद्धिंगत होतो. अशा ठिकाणी उत्कृष्ट विद्यार्र्थी निर्माण होण्याची शक्यता वाढते. उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट विद्यार्र्थी हे दोन्ही घटक एकमेकांकडून सर्वोत्कृष्टतेची अपेक्षा करतात आणि दर्जा वृद्धिंगत होतो. विद्यापीठामधील संशोधन हे लोकाभिमुख असलेच पाहिजे. कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठाने आदर्श प्रथा व परंपरा जोपासत असतानाच ग्रामीणतेचा न्यूनगंड मात्र झुगारून दिला आहे. एकविसाव्या शतकातील विद्यापीठाची वाटचाल आता ही वैश्विकतेकडे होते आहे. विद्यापीठाच्या पुढील दहा वर्षांच्या वाटचालीचा कृतिशील आराखडा आम्ही तयार केला असून, त्यानुसार आमची वाटचाल सुरू आहे.प्रा. यादव यांच्या हस्ते विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक व प्रशासकीय सेवक यांना पारितोषिके देऊन सन्मानित केले. त्याचप्रमाणे विद्यापीठातील शिक्षक व प्रशासकीय सेवकांच्या गुणवत्ताधारक पाल्यांचाही विद्यापीठ प्रशासकीय व कल्याण निधी पारितोषिके देऊन गुणगौरव केला. प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पारितोषिके देऊन गौरविले. दरम्यान, आज सकाळी विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरू डॉ. पवार व प्रा. यादव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. डी. व्ही. मुळे यांनी आभार मानले. बीसीयूडी संचालक डॉ. अर्जुन राजगे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) यांचा झाला सत्कार विद्यापीठातील गुणवंत शिक्षक प्रा. प्रमोद पाटील (पदार्थविज्ञान अधिविभाग), महाविद्यालयीन गुणवंत शिक्षक डॉ. शैलजा माने (सहयोगी प्राध्यापक, कला व वाणिज्य महाविद्यालय, नागठाणे, जि. सातारा), बॅ. पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक डॉ. अशोक हजारे (कॉलेज आॅफ फार्मर्सी, मोरेवाडी, जि. कोल्हापूर), प्राचार्य सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त शिक्षिका डॉ. प्रज्ञा घोरपडे (आटर्स अ‍ॅँड कॉमर्स कॉलेज, कासेगाव), विद्यापीठातील गुणवंत सेवक रमेश गवळी (अधीक्षक), सुरेखा आडके (वरिष्ठ सहायक), आनंदा वारके (शिपाई), महाविद्यालयीन गुणवंत सेवक संतोष गायकवाड (मुख्य लिपिक, बाळासाहेब चितळे महाविद्यालय, भिलवडी).