सरुड : एक आदर्श मतदारसंघ बनवण्याचा मानस असून, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन आमदार सत्यजित पाटील यांनी केले. सरुड (ता. शाहूवाडी) येथे आयोजित विकासकामांचा प्रारंभ व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर म्हणाले, विकासकामे करणाऱ्याच्या मागे उभे राहा. विकासकामांचा पाठपुरावा करावा. आगामी काळात आमदार सत्यजित पाटील विकासकामांचा डोंगर उभा करतील. यावेळी उपसभापती पांडुरंग पाटील, नामदेवराव पाटील, दगडू पाटील, दत्ता पोवार, निवास जगताप, दिलीप पाटील, गामाजी ठमके, सुधाकर पाटील, बनेश साठे, आप्पासो साळुंखे, माजी शिक्षण व बालकल्याण सभापती शैलजादेवी गायकवाड यांची भाषणे झाली. पं. स. सदस्या प्रभावती पोतदार, जि. प. सदस्या लक्ष्मी पाटील, लताताई पाटील, ‘गोकुळ’च्या संचालिका अनुराधा पाटील, युवराज पाटील, संगीता पाटील, मीना घोलप, संग्रामसिंह खराडे, सर्जेराव माणकर, दत्ता राणे, भीमराव पाटील, सुभाष जामदार, के. एन. लाड, तात्या पाटील, जालिंदर पाटील, मारुती पाटील, राजू भोपळे, शौकत कळेकर, किसन चांदणे, टी. डी. पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डी. आर. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
विकासासाठी प्रयत्नशील राहू
By admin | Updated: November 23, 2015 00:04 IST