शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

छंदातून जपला ‘पोस्टकार्ड’चा ठेवा

By admin | Updated: December 16, 2014 00:17 IST

कागलच्या शामराव पाटील यांचा उपक्रम : हस्तकौशल्याद्वारे पाठविली अडीच हजार पत्रे

जहॉँगीर शेख - कागल -इंटरनेटच्या युगात संवादाची साधने बदलली आहेत. संवादाची पारंपरिक साधने बाजूला फेकली गेली आहेत. त्यापैकीच संदेशाचे देवाण-घेवाण करणारे एक साधन म्हणजे पोस्टकार्ड. ‘पोस्टकार्ड’चा वापर आता दुर्मीळ होत चालला आहे; पण कागलच्या सुभाष चौकातील ज्येष्ठ नागरिक शामराव भागोजी पाटील यांनी पोस्टकार्डचा हा ठेवा जिवापाड जपला आहे. त्यांनी सुमारे अडीच हजार हस्तलिखित पोस्टकार्डे पाठविली आहेत.पाटील यांच्या संबंधित कोणतीही घटना घडू दे, ते त्याची दखल घेत संबंधिताशी पोस्टकार्डाच्या माध्यमातून संवाद साधतात. पोस्टकार्ड आपल्या हस्तलेखणाने सजवून-रंगवून आतापर्यंत सुमारे अडीच हजार पोस्टकार्डे पाठविल्याची नोंदही त्यांनी ठेवली आहे. शामराव पाटील वीज महामंडळात नोकरीस होते. २००४ मध्ये ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी स्वत:ला विविध क्षेत्रांत गुंतवून घेतले. त्यांच्या पिढीत संवादाचे महत्त्वाचे साधन असणारे पोस्टकार्ड आता अडगळीत पडत आहे. हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी मग रोज एक पोस्टकार्ड लिहिण्याचा छंद सुरू केला. वाढदिवस, शुभेच्छा, यश, निवड, लग्न सोहळा, वास्तुशांती अशा कोणत्याही कौतुकाची बातमी समजली की, शामराव पाटील शुभेच्छा देण्यासाठी रंगीबिरंगी पोस्टकार्ड घेऊन संबंधितांच्या घरी पोहोचतात. इतकेच नाही, तर आजारपण, दु:खद प्रसंग याबद्दलही धीर देणारे चार शब्दही ते याच पोस्टकार्डच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवितात. कागल परिसरातील लोकांनाही आता पाटील यांच्या पोस्टकार्डच्या आगमनाची प्रतीक्षा लागलेली असते. पोस्टकार्डाशी मैत्रीशामराव पाटील महिन्याला सरासरी २० ते २५ पत्रे लहितात. अनेकांनी त्यांची ही पत्रे लॅमिनेशन करून घरामध्ये दर्शनी भागात लावली आहेत. या छंदाबरोबरच पाटील हे येथील मॉर्निंग ग्रुप, ज्येष्ठ नागरिकांच्या गोलमेज परिषदेत सहभागी आहेत. पोस्टकार्डाचा हा छंद म्हणजे, खरे तर यानिमित्ताने पाटील यांनी पोस्टकार्डांशी बालपणापासूनची असणारी मैत्रीच जपली आहे.छंद नसणारा माणूस आयुष्यभर एकाकीपणाची शिक्षा भोगत असतो. त्यामुळे उतारवयातील जीवन आनंदमय करण्यासाठी प्रत्येकाला अंत:करणातून एखादा छंद जोपासणे गरजेचे आहे. पोस्टकार्डाद्वारे लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे स्वत:ही आणि समोरच्या व्यक्तीलाही आनंद आणि मोठा आधार वाटतो. त्यामुळे मी दिवसातील काही तास खर्च करून पोस्टकार्ड लिहून ती पाठविण्याचा छंद जोपासला आहे.- शामराव भागोजी पाटील, कागलया पोस्टकार्डवर सुंदर, सुवाच्च, मोत्यासारखे हस्ताक्षर आणि आशयपूर्ण शब्दशृंखला तर असतेच; पण एखादी समर्पक कविता, श्लोक, शब्दरचनाही त्यामध्ये दिलेली असते. जेथे पत्ता लिहिण्यासाठी जागा असते, त्याला लागून जो मोकळा भाग असतो, त्या जागेवर त्यांनी प्रसंगानुरूप सुंदर असे चित्रही काढलेले असते. हे चित्र तर चित्रकारांची कसब दाखविणारे असते. निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, एखादे प्रतीक, स्थळ तसेच व्यंगचित्र यामध्ये यांचा मुक्तसंचार यानिमित्ताने पाहायला मिळतो.