शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘केशवराव’चे भाडे चार हजारपर्यंतच मर्यादित ठेवा

By admin | Updated: March 18, 2016 00:39 IST

नाट्यप्रेमींची मागणी : महापौरांची घेतली भेट; नूतनीकरणातील किरकोळ अडचणीवर वेधले लक्ष

कोल्हापूर : महानगरपालिकेने नूतनीकरण केलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे भाडे रंगकर्मींना परवडेल असे चार हजार रुपयांपर्यंतच नाममात्र असावे, अशी विनंती कोल्हापुरातील नाट्यसंस्था, नाट्य वितरक, तंत्रज्ञ, कलाकारांनी गुरुवारी महापौर अश्विनी रामाणे यांना केली. नूतनीकरण करण्यात आल्यानंतरही काही किरकोळ अडचणी निदर्शनास आल्या असून, त्याकडेही या रंगकर्मींनी लक्ष वेधले. कोल्हापुरातील रंगकर्मींनी महापौर रामाणे यांना एक निवेदनही दिले. संजय हळदीकर, संजय मोहिते, संतोष शिंदे, प्रफुल्ल महाजन, आनंद कुलकर्णी, किरण चव्हाण, अजय कुरणे, पप्पू गवस, अवधूत जोशी, युवराज घोरपडे, सुनील माने, ज्ञानेश मुळे, आदींचा महापौरांना भेटलेल्या शिष्टमंडळात समावेश होता. नूतनीकरणानंतर नाट्यगृह खुले झाल्याने नाट्यसंस्थांना चांगल्या परिपूर्ण थिएटरची उपलब्धता झाली आहे. यापूर्वी चांगले नाट्यगृह नसल्याने पुणे, मुंबई व इतर शहरांतील नाट्यसंस्थांनी पाठ फिरविली होती. आता या नाट्यसंस्था कोल्हापूरकडे येण्याची आश्वासकता निर्माण झाली आहे, परंतु नाट्यगृहाचे भाडे हा फार महत्त्वाचा व कळीचा मुद्दा आहे. नाटककला ही सांस्कृतिक चळवळ म्हणून पाहिले पाहिजे. भाडे ठरविताना याचा विचार व्हावा. पुणे महानगरपालिकेच्या बालगंधर्व नाट्यगृहाचे भाडे ४५०० रुपये आहे. धनकवडी, कोथरुड, सातारा, इचलकरंजी येथील नाट्यगृहांचे भाडेही ४५०० रुपये आहे. कोल्हापुरात शाहू महाराजांनी कला जोपासली जावी म्हणून नाममात्र दरात नाट्यगृह उपलब्ध करून दिले होते. राज्यातील नाट्यगृहांचे भाडे आणि कोल्हापूरचा वारसा लक्षात घेऊन केशवराव भोसले नाट्यगृहाचे भाडेही चार हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात यावे, अशी विनंती निवेदनात करण्यात आली. नाट्यगृहात नाटक सादर करताना तंत्रज्ञ, कलाकारांच्या तसेच रसिकांच्या दृष्टीने काही सुधारणा होणे बाकी असल्याचेही रंगकर्मींनी नमूद केले.हे बदल हवेत..मेकअप रूममध्ये कपाट, हँँगर अडकविण्याची सुविधाकपडे इस्त्री करण्यासाठी टेबल, बसण्यासाठी खुर्च्या कलाकार व प्रेक्षकांना पिण्याच्या पाण्याची सोयविंगेत कलाकारांना बसण्यासाठी खुर्च्याप्रेक्षकांना बाहेर वेटिंग चेअर्सतिकीट बुकिंगसाठी आॅफिस एक्झिट लाईट प्रखरताकमी करावीनाट्यगृहाबाहेर स्लायडिंगजाहिरात बोर्ड करानाट्यगृहाच्या स्वत:च्या लेवल (नेपथ्याचा भाग) असाव्यात पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाचे भाडे ४५०० रुपये आहे. धनकवडी, कोथरुड, सातारा, इचलकरंजी येथील नाट्यगृहांचे भाडेही ४५०० रुपये आहे. कोल्हापूरला शाहू महाराजांनी नाममात्र दरात नाट्यगृह उपलब्ध करून दिले होते.