शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता राखा, ‘कोरडा’ दिवस पाळा: ‘डेंग्यू’ला रोखण्याचे सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:32 IST

कोल्हापूर : शहरातील डेंग्यूसदृश रुग्णांचा आकडा रविवारअखेर ४५० पर्यंत पोहोचला आहे. या रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या घराच्या परिसरात स्वच्छता राखण्यासह आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची टाकी, भांडी स्वच्छ करून ती कोरडी ठेवणे, असे सोपे उपाय महत्त्वाचे ठरणार आहेत. अशा स्वरूपातील स्वच्छता आणि कोरडा दिवस पाळण्यासाठी शहरातील सामाजिक ...

कोल्हापूर : शहरातील डेंग्यूसदृश रुग्णांचा आकडा रविवारअखेर ४५० पर्यंत पोहोचला आहे. या रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्यूला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या घराच्या परिसरात स्वच्छता राखण्यासह आठवड्यातून एकदा घरातील पाण्याची टाकी, भांडी स्वच्छ करून ती कोरडी ठेवणे, असे सोपे उपाय महत्त्वाचे ठरणार आहेत. अशा स्वरूपातील स्वच्छता आणि कोरडा दिवस पाळण्यासाठी शहरातील सामाजिक संस्था, तरुण मंडळांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील विविध परिसरांत डेंग्यू, हिवतापसदृश रुग्ण आढळत आहेत. महानगरपालिका शहरात डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहीम राबवीत आहे.या मोहिमेसह नागरिकांनी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर स्वच्छता राखण्यासह दक्षता घेणे आवश्यक आहे. अनेकांच्या घर आणि दुकानांमध्ये फूलदाणी, धातूचे कासव, फेंगशुईचे बांबू, ग्लासमध्ये लिंबू, फिश टँक, फ्रिजचे कंडेन्सर यामध्ये पाणी असते. ते आठ दिवसांपेक्षा अधिक राहिल्यास त्यात अळ्या होण्याची शक्यता असते; त्यामुळे ते रोज बदलावे. या वस्तूंसह घरातील टेरेस आणि जमिनीवरील पाण्याच्या टाक्या, पाणी साठविलेली भांडी आठवड्यातून एकदा स्वच्छ करून ती २४ तासांपर्यंत कोरडी ठेवावीत. घर, कॉलनी, अपार्टमेंटचा मोकळा परिसर आणि गटारी स्वच्छ ठेवाव्यात. अनावश्यक झुडपे काढावीत. टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामे कॅन, आदींमध्ये पाणी साचू देण्यात येऊ नये.कायमच्या पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडावेत. ‘डेंग्यू’ला रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत.सोपे उपायघरगुती पाणीसाठे, बॅरेल, हौद, गच्चीवरील टाक्या आठवड्यातून एकदा स्वच्छ कराव्यात.टायर, माठ, पत्र्याचे डबे, नारळाची करवंटी यांची योग्य विल्हेवाट लावावी.गटारे वाहती करावीत. डबकी बुजवून परिसर स्वच्छ ठेवावा.परिसरात गवती चहा, कडूनिंब, तुळशीची रोपे लावावीत.आहारात हे असणे उपयुक्तपपईमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ असते. त्याचे सेवन हे रक्तातील प्लेटलेट्स वाढविते. आले घातलेला चहा अ‍ॅँटी बॅक्टेरिअल असतो. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स असते. करक्युमिन असलेली हळद, ‘व्हिटॅमिन सी’युक्त संत्र्यांचा रस आहारात असणे उपयुक्त आहे.