शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

न्याय संस्थेवरील विश्वास अबाधित राखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 23:53 IST

राजेंद्र सावंत : गडहिंग्लजला नूतन न्याय संकुलाचे शानदार उद्घाटन

गडहिंग्लज : न्यायालयात गेले तरच न्याय मिळतो, अशी धारणा आजही समाजात आहे. लोकांचा हा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी न्यायाधीश आणि वकिलांवर आहे. न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास व आदर अबाधित राखण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. राजेंद्र सावंत यांनी केले.येथील नूतन न्याय संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र अवचट होते. न्यायसंकुलाच्या भव्यदिव्य इमारतीची पूर्तता हे सर्वांच्या प्रयत्नांचे फलित आहे, असे सावंत यांनी यावेळी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले, वकिली हा व्यवसाय नसून पेशा आहे. त्यामुळे वकिलांनी आपले कौशल्य व ज्ञान वाढवून पक्षकारांना वेळेवर व योग्य न्याय मिळण्यासाठी सहकार्य करावे. न्या. अवचट म्हणाले, गडहिंग्लज शहराला वेगळी ओळख आहे. २० वर्षांत एक रुपयाचीही भाडेवाढ न करता नगरपालिकेने जिल्हा न्यायालयासाठी इमारत उपलब्ध करून दिली. त्याबद्दल पालिकेचे आभारी आहोत.कार्यक्रमास नगराध्यक्षा स्वाती कोरी, आमदार हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, ज्येष्ठ विधितज्ज्ञ डी. बी. भोसले, शिवाजीराव चव्हाण, न्यायाधीश यामिनी बोरावके, आनंद व्होडावडेकर, संग्राम काळे, सतीश चंदगडे, राजेंद्र रोटे, रवी नडगदल्ली, मकरंद कुलकर्णी, श्रीनिवास पटवर्धन, धैर्यशील नलवडे, सुभाष घाटगे, अभिजित देसाई, कोकितकर, किसनराव कुराडे, मल्लाप्पाण्णा चौगुले, अ‍ॅड. कुंडलिक गावडे, ंआदी उपस्थित होते. ‘न्यायदीप’ या स्मरणिकेचे प्रकाशन न्यायमूर्ती सावंत यांच्या हस्ते झाले. गडहिंग्लज वकील संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पोवार यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी आभार मानले. मीरा जोशी यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.