शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

केडीसीसी-न्यूट्रीयन्टस करार रद्द--वार्षिक सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना भाडेतत्त्वावर ह्यन्यूट्रीयन्टसह्ण कंपनीला देण्याबाबत केलेला करार रद्द करण्याचा ठराव जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या सभेत सोमवारी करण्यात आला. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकºयांचे नाव गावचावडी घेऊन वाचन करण्याचे आदेश सरकारने दिले असले तरी हा प्रकार म्हणजे शेतकºयांची बदनामी असल्याने त्याला विरोध करत ...

ठळक मुद्देकर्मचाºयांच्या पगारावर ८६ कोटी ८८ लाख खर्च होतो, दरवर्षी त्यात सहा कोटींची वाढ होते.इतर साखर कारखान्यांनी दुसरी व तिसरी उचल दिली असताना चंदगडहा प्रकार म्हणजे शेतकºयांची बदनामी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना भाडेतत्त्वावर ह्यन्यूट्रीयन्टसह्ण कंपनीला देण्याबाबत केलेला करार रद्द करण्याचा ठराव जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या सभेत सोमवारी करण्यात आला. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकºयांचे नाव गावचावडी घेऊन वाचन करण्याचे आदेश सरकारने दिले असले तरी हा प्रकार म्हणजे शेतकºयांची बदनामी असल्याने त्याला विरोध करत चावडी वाचन बंदचा ठरावही यावेळी करण्यात आला.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शाहू सांस्कृतिक मंदिर येथे झाली. दीड तास चाललेल्या सभेत संस्था प्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. प्रास्ताविकात अध्यक्ष मुश्रीफ यांनी बॅँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांनी अहवाल वाचन केले.न्यूट्रीयन्टस कंपनीने शेतकºयांचे दोन कोटी थकविल्याचे निदर्शनास आणून देत भीमराव चिमणे यांनी या विषयाला हात घातला. त्यामध्ये हस्तक्षेप करत ह्यगोकुळह्णचे संचालक राजेश पाटील म्हणाले, बॅँकेच्या गेल्या सभेत शेतकºयांची सन २०१०-११ ची एफआरपी, कर्मचाºयांची देणी देण्याचे आश्वासन ह्यन्यूट्रीयन्टसह्ण कंपनीने दिले होते, त्याचे काय झाले.

इतर साखर कारखान्यांनी दुसरी व तिसरी उचल दिली असताना चंदगड तालुक्यातील शेतकºयांच्या पदरात अजून पहिली उचल मिळालेली नाही, याला जबाबदार कोण? संबंधित कंपनीची आर्थिक क्षमता नसल्याने त्यांच्याशी केलेला करार रद्द करून दुसºया सक्षम कंपनीला देण्याचा ठराव मांडला. त्याला सभागृहाने टाळ्याच्या गजरात मान्यता दिली. साखर चोरीबाबत काय केले ? असे भगवान काटे यांनी विचारले, यावर संबंधितांकडून पैसे वसूल झाले असून फौजदारीची कारवाईही केल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.

कर्मचाºयांच्या पगारावर ८६ कोटी ८८ लाख खर्च होतो, दरवर्षी त्यात सहा कोटींची वाढ होते. हा खर्च कमी करण्याची मागणी रमेश कामिरकर (शाहूवाडी) यांनी केली. महागाई भत्यामुळे पगार वाढत चालले आहेत, याबाबत लवकरच कर्मचारी युनियनशी बैठक घेऊन सांगली व सातारा बँकेतील कर्मचाºयांच्या पगार पाहून निर्णय घेण्यात येतील, असे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. एकरी साठ हजार रुपये पीक कर्ज द्यावे, अशी मागणी बाबासाहेब देवकर, एकनाथ चव्हाण यांनी केली. तुकाराम पाटील, किसन कुराडे, रामचंद्र मोहिते, दत्ता पाटील, बी. एन. पाटील यांनी चर्चेत भाग घेतला. उपाध्यक्ष अप्पी पाटील यांनी आभार मानले.

कागलची ६२ टक्केच वसुली?चंदगडमध्ये संचालक नसताना ९५ टक्के पीक कर्जाची वसुली झाली, मग कागल तालुक्यात ६२ टक्केच कशी? अशी विचारणा भीमराव चिमणे यांनी केली. त्यावर कर्जमाफीत जास्त अपात्र ठरल्याने वसुली झाली नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.परवानगी मिळताच ह्यराजेशह्णना स्वीकृतअहवालात नरसिंग पाटील यांचा फोटो छापला नसल्याने चंदगडमधील संस्थांनी नाराजी व्यक्त केली, याबद्दल प्रतापसिंह चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. स्वीकृत करण्याचे अधिकार शासनाला असल्याने परवानगी मिळताच राजेश नरसिंग पाटील यांना स्वीकृत करून घेतले जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.या झाल्या मागण्या :ह्यनाबार्डह्णने शंभर टक्के कर्जपुरवठा करावाव्याज सवलतीसाठी अठरा महिन्यांचा कालावधी धरावाकर्मचाºयांना ड्रेसकोड कराराष्टÑीयीकृत बॅँकांचे धनादेश लवकर वटवाओटीएसचा लाभ मिळालेल्या संस्थांना फेरकर्ज द्या७/१२ वर गृहकर्ज द्यावे.खावटी कर्ज १२ टक्क्यांनी द्यावे.अपात्र ११२ कोटींबाबत बॅँकेने सर्वोच्च न्यायालयात एकत्रित म्हणणे द्यावे.शंभर टक्के वसुली करणाºया संस्थांचा गौरव करा.महाडिक, कोरेंची दांडीकाही कारणांमुळे वर्षभर संस्थेच्या कामकाजात सहभाग घेता आला नसला तरी सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणे, हा सहकारात अलिखित नियम आहे; पण बँकेच्या सभेला संचालक विनय कोरे व महादेवराव महाडिक यांनी नेहमीप्रमाणे दांडी मारली. त्याची सभास्थळी जोरदार चर्चा होती.

१५ टक्क्यांपर्यंत लाभांशनोटाबंदी, कर्जमाफीमुळे नफ्यावर परिणाम झाला. चालू वर्षी ६ हजार कोटींच्या ठेवी, शंभर कोटींच्या नफ्याचे उद्दिष्ट असून सभासदांना १५ टक्क्यांपर्यंत लाभांश देणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

अनुदानाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणारकर्ज परतफेड तारखेच्या गुंत्यावरून प्रोत्साहनपर अनुदानापासून शेतकºयांना वंचित राहावे लागणार आहे. दुसºया टप्प्यात ही दुरूस्ती करण्याचे आश्वासन जरी पालकमंत्र्यांनी दिले असले तरी वाट न पाहता पहिल्या टप्प्यातच मार्गी लागावे, अशी सूचना बाबासाहेब देवकर यांनी केली. त्यावर शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायचे असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.