शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘केडीसीसी’चा बिगुल वाजला

By admin | Updated: March 28, 2015 00:27 IST

५ मे रोजी मतदान : ४ एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेसाठी (केडीसीसी) ५ मे रोजी मतदान होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांची राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. आनंद जोगदंड यांनी शुक्रवारी नियुक्ती केली. जिल्हास्तरीय संस्थांच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच सहकार विभागातील अधिकाऱ्याची वर्णी लावली आहे. जिल्हा बॅँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी बॅँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणूक अधिकारी नियुक्तीसाठी विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार डॉ. कदम यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा बॅँकांच्या निवडणुका या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असा प्रयत्न होता; पण प्राधिकरणाने सहकारातील अधिकाऱ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमही प्राधिकरणाने तयार केला असून, ४ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. ८ एप्रिलपर्यंत अर्ज दाखलची मुदत असून, ९ एप्रिलला अर्जांची छाननी आहे. ११ ते २४ एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे. तसेच ५ मे रोजी मतदान तर ६ मे रोजी मतमोजणी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. जिल्हा बँकांसाठी केंद्रीय पद्धतीकेंद्रीय निवडणूक आयोगाप्रमाणे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील पात्र जिल्हा बॅँकांच्या निवडणुकींचा कार्यक्रम एकत्रित लावला आहे. राज्यातील १८ जिल्हा बॅँकांचा मतदार यादीचा कार्यक्रम एकाच दिवशी सुरू केला होता. आता मतदानही एकाच दिवशी घेतले जाणार आहे.निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्तीचे पत्र अद्याप मिळालेले नाही. पत्र मिळताच प्राधिकरणाच्या सूचनेनुसार पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. - डॉ. महेश कदम