शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय गटात ‘कवडसा’ सर्वोत्कृष्ट माहितीपट, विंटेज चित्रपट महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:42 IST

शाहू स्मारक भवन येथे झालेल्या दुसऱ्या विंटेज ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९’मध्ये राष्ट्रीय गटात ‘कवडसा’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट, तर आंतरराष्ट्रीय गटात सर्वोत्कृष्ट माहितीपट हा पुरस्कार ‘द शेअरिंग प्रोजेक्ट’ने पटकाविला. दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक, रंगकर्मी देवेशजी इनामदार (औरंगाबाद) यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देराष्ट्रीय गटात ‘कवडसा’ सर्वोत्कृष्ट माहितीपट विंटेज चित्रपट महोत्सवाची सांगता

कोल्हापूर : शाहू स्मारक भवन येथे झालेल्या दुसऱ्या विंटेज ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१९’मध्ये राष्ट्रीय गटात ‘कवडसा’ हा सर्वोत्कृष्ट माहितीपट, तर आंतरराष्ट्रीय गटात सर्वोत्कृष्ट माहितीपट हा पुरस्कार ‘द शेअरिंग प्रोजेक्ट’ने पटकाविला. दिग्दर्शक विद्यासागर अध्यापक, रंगकर्मी देवेशजी इनामदार (औरंगाबाद) यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.विंटेज इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलला शनिवारपासून प्रारंभ झाला. दोन दिवस झालेल्या या महोत्सवात २१ देशांतील २१० चित्रपट दाखविण्यात आले. महोत्सवात म्युझिक व्हिडिओंसह जपान, युके, रशिया, कॅनडा, अमेरिका, मकाऊ, इराण, फ्रान्स, सौदी अरेबिया, नेदरलॅँड, स्वित्झर्लंड, स्पेन, चीन, बांगलादेश अशा विविध देशांतील चित्रपट, लघुपट, माहितीपट, अ‍ॅनिमेशन फिल्मचा समावेश आहे.देशविदेशांतील विविध भाषा, संस्कृतीतील लघुपट पाहताना विविधतेतून एकात्मता याची सातत्याने जाणीव होत राहते, असे प्रतिपादन ‘मीट द ज्यूरी’अंतर्गत डॉ. अनमोल कोठाडिया यांनी उपस्थित लघुपटकर्ते आणि प्रेक्षक यांच्याशी संवाद साधताना केले. त्यानंतर बक्षीस वितरण झाले. महोत्सवाचे आयोजन विंटेज फिल्म फौंडेशनचे चेतन पडोळे, सचिन भोईराजे यांनी केले होते. सायली प्रभावळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आंतरराष्ट्रीय गटात : सर्वोत्कृष्ट माहितीपट : ‘द शेअरिंग प्रोजेक्ट’ (अमेरिका), सर्वोत्कृष्ट लघुपट : 'रिटर्न फ्रॉम द स्टार्स' (रशिया), विशेष ज्यूरी पुरस्कार- ‘हेलेना’ (झेक प्रजासत्ताक / शंतनू नाईक), सर्वोत्कृष्ट अनिमेशनपट- ‘नाऊ युअर होम’ (भारत / प्रसाद महेकर ) हे ठरले.राष्ट्रीय गटात : ‘कवडसा’ (धनश्री कोल्हे) ने सर्वोत्कृष्ट माहितीपटासह, छायाचित्रण (श्रीजित बसू) आणि विशेष ज्यूरी पुरस्कार (कलरिस्ट - राहुल मर्चंट) असे तीन पुरस्कार पटकावले; तर संकलनाचा हिरण्या कलिता हिला ‘कैरुस्कुरो’साठी मिळाला. ‘स्टेन्स’ (रिहा मॅथ्यूज / मल्याळम)ने सर्वोत्कृष्ट लघुपटासह, दिग्दर्शन आणि संकलनाचे असे तीन पुरस्कार पटकावले. ‘लुक ट द स्काय’ (अशोक वैलौउ, मणिपूर - पाउलाह या बोलीभाषेतील)ने द्वितीयसह छायाचित्रण (जितू जॉर्ज) असे दोन पुरस्कार पटकावले. ‘शैला'ज (नेहा आर.टी.) ने विशेष ज्यूरी पुरस्कार पटकावला.

‘गोल्डन टॉयलेट’(मराठी)ने पटकथा (उमेश मालन) आणि अभिनेत्री (प्रियांका चव्हाण) असे दोन पुरस्कार पटकावले. ‘द वेटिंग’ (तमिळ)ने ध्वनिसंयोजन (राजकृष्णन एम. आर.) आणि अभिनेता (शेषू) असे दोन पुरस्कार पटकावले. ‘पॅम्पलेट’ (मराठी)ला बाल अभिनयासाठीचा प्रमोद रणखांबे यांना मिळाला.

महोत्सव आयोजकांनी निवड समितीच्या शिफारशीनुसार ‘दृष्टिकोन’ (अरुण अडसुळे) आणि 'खानेह बे दुश' (मन्सूर येझदी) यांची विशेष नोंद घेतली. सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम ‘हालत’ ( चेतन कचरे) हा ठरला. या महोत्सवासाठी परीक्षक म्हणून समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया (कोल्हापूर), लघुपटकर्ता निनाद कुलकर्णी (पुणे), तर म्युझिक अल्बम गटासाठी नितीन पेडणेकर (मुंबई) यांनी काम पहिले.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर