कोल्हापूर : काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून कॉलेजला जाता आले नाही. मात्र, इंटरनेट आणि मित्र-मैत्रिणींकडून माहिती घेऊन केलेली मेहनत आणि निव्वळ जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी झाल्याचे काश्मीर विद्यापीठाची विद्यार्थिनी अरुणा खान हिने सांगितले. शिक्षण घेऊन भविष्य घडविण्यासाठी काश्मीरची तरुणाई झटत असल्याचेही तीने सांगितले.ती म्हणाली, सहा दिवस जीव मुठीत घेऊन बसचा प्रवास करून कानपूरमधील महोत्सवात सहभागी झालो होतो. कोल्हापूर, महाराष्ट्रबद्दल काहीच माहीत नाही. मात्र, याठिकाणी आल्यानंतर इथल्या लोकांचा स्वभाव आवडला. (प्रतिनिधी)युनिव्हर्सिटी आॅफ जम्मूची गौरी ठाकूर हिने जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीत मोठा फरक आहे. याठिकाणी आम्ही निर्भयपणे जीवन जगत आहोत. ‘यहाँ की अंबामाता का मंदिर और कोल्हापुरी जूतों के बारे में सुना है. अब अंबामाता का दर्शन जरूर करुंगी और कोल्हापुरी जूता लेकरजाऊंगी.
शिक्षणासाठी काश्मीरची तरुणाई झगडतेय
By admin | Updated: February 14, 2017 01:12 IST