शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कसबा सांगावची पाणी योजना राज्यातील सर्वात मोठी योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST

मंत्री हसन मुश्रीफ म्हणजे जनतेच्या जिवाभावाचे नेतृत्व पालकमंत्री सतेज पाटील यांचे गौरवोद्गार कसबा सांगाव : जलजीवन मिशनअंतर्गत कसबा सांगाव ...

मंत्री हसन मुश्रीफ म्हणजे जनतेच्या जिवाभावाचे नेतृत्व

पालकमंत्री सतेज पाटील यांचे गौरवोद्गार

कसबा सांगाव : जलजीवन मिशनअंतर्गत कसबा सांगाव येथील पिण्याच्या पाण्याची ही राज्यातील सर्वात जास्त निधीची व मोठी योजना आहे. या योजनेला तब्बल १२ कोटी निधी मंजूर झाला आहे, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कसबा सांगाव (ता. कागल) येथे १२ कोटी निधीच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या पाइपलाइन कामाचा शुभारंभ मंत्री ना. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन झाले.

यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे जनतेच्या जीवाभावाचे नेतृत्व आहे. संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व म्हणून त्यांचा जिल्ह्यासह राज्यात नावलौकिक आहे. गोरगरिबांच्या सेवेबरोबरच त्यांनी विकासकामांचा उभा केलेला डोंगरही अफाट आहे. नेतृत्व हे लोकांचे अश्रू पुसणारे असेल तर वारंवार निवडून येण्याचा चमत्कार घडतो. रोजगार निर्मिती युक्त काम करण्यासाठी आम्हा दोघांचे एकत्रित प्रयत्न, कोल्हापूर जिल्ह्याला दिशा देण्याची काम करत आहोत.

यावेळी बोलताना खासदार संजय मंडलिक म्हणाले की, कागल तालुका राज्यात नमुनेदार ठरावा, हे खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे स्वप्न होते. ही इच्छा ना. हसन मुश्रीफ व आमच्या प्रयत्नातून फलद्रूप होताना दिसत आहे.

यावेळी भैया माने व जि.प.सदस्य युवराज पाटील यांचे भाषण झाले.

कार्यक्रमास गोकूळचे चेअरमन विश्वास पाटील, पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर, जि. प. महिला व बालकल्याण सभापती सौ. शिवानी भोसले, शशिकांत खोत, हमिवाडा संचालक कैलास जाधव, सौ.राजश्री माने,

कृष्णात पाटील आदींसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वागत सरपंच रणजित कांबळे यांनी केले, प्रास्ताविक किरण पास्ते यांनी केले. आभार उपसरपंच विक्रमसिंह जाधव यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------

१)चौकट : यावेळी बोलताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले की, मतदारसंघातील लोकांची कामे कशी करावीत, विकासकामे कशी करावीत हे ना.मुश्रीफ यांचेकडून शिकाव, कागल मतदारसंघातील विकास कामे बघून आमदार ऋतुराजला ट्रेनिंगला पाठवावे लागेल. नवीन आमदारांनी कशी विकासकामे करावीत याचे ट्रेनिंग ना. मुश्रीफच देऊ शकतात, अशा शब्दात मुश्रीफ यांचा गौरव केला.

२)चौकट : खासदारांनी हायकोर्टात गेले पाहिजे.

विरोधी पक्षाच्या खासदारांना विकास कामासाठी पुरेसा निधी भाजपकडून मिळत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी माझाच फोटो दिसला पाहिजे, हे मोदींचे काम त्यामुळे निधीसाठी खासदारांनी हायकोर्टात जायला हवे, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.

------------------------------------------------------------------------

फोटो ओळी

कसबा सांगाव, ता. कागल येथील जाहीर सभेत बोलताना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व समोर उपस्थित जनसमुदाय.