शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कसबा बीडच्या गणेश तलावाला केंदाळाचा वेढा!

By admin | Updated: September 18, 2015 23:41 IST

अकराव्या शतकाचा साक्षीदार : पाणी बनले दूषित, वाढत्या अतिक्रमणामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात

शिवराज लोंढे -- सावरवाडी  --अकराव्या शतकात भोज राजाने बांधलेल्या आणि प्राचीन ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कसबा बीड (ता. करवीर) गावच्या प्राचीन तलावाची सध्या अवस्था बिकट झाली आहे. तलावात वाढत्या जलपर्णीने वेढा दिला आहे. केंदाळ, पान वनस्पती, गारवेलीचे वाढते साम्राज्य यामुळे पाणी दूषित बनले आहे. तलावाभोवती वाढत्या आक्रमणामुळे भविष्यात या गणेश तलावाचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. अकराव्या शतकात भोज राजाने या तलावाची उभारणी केली. त्या काळात या तलावाचा जनतेने पिण्यासाठी पाण्याचा वापर केला होता. कालांतराने या तलावाची देखभाल करण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले.सर्व्हे नंबर २२१/१ मधील सोळा एकर क्षेत्राच्या परिसरात या गणेश तलावाची उभारणी केली आहे. तलावामध्ये गेल्या ३० वर्षांपासून प्रचंड स्वरूपाचा गाळ साचलेला आहे. गाळामुळे तलावातील पाणी दूषित बनल्याने दुर्गंधीयुक्त हवामान निर्माण झाले आहे. तलावामध्ये गेल्या २५ वर्षांपासून पान वनस्पती, जलपर्णी, केंदाळाचे साम्राज्य वाढलेले आहे. तलावाच्या पश्चिम बाजूला गारवेली वाढलेल्या आहेत. तलावाच्या पूर्वेस दगडी भराव बांधलेला होता; पण त्याचीही कालांतराने पडझड झाली होती. तलावासभोवार अतिक्रमणे वाढलेली आहेत.पूर्वी तलावातील पाण्याचा वापर शेतीसाठी व मच्छ व्यवसायासाठी केला जात होता; पण शासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या या गणेश तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गणेश तलावाला अद्याप शासकीय निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे या परिसराचा गेली कित्येक वर्षे विकास खुंटलेला आहे. राज्य शासनाने कसबा बीड नगरीला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा दिला; पण शासकीय निधीअभावी अनेक कामे ठप्प झाली आहेत. गणेश तलाव परिसरात मिनी रंकाळ््याचे स्वप्न अधुरे राहिले. पर्यावरणाच्या दृष्टीने तलावाला महत्त्व देण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात या ऐतिहासिक स्थळाचे अस्तित्व धोक्यात येणार ही काळ्या दगडावरील रेघ आहे. नव्या बदलत्या काळात गणेश तलाव परिसराचा विकास होणे आवश्यक आहे. गणेश तलाव हा प्राचीन ऐतिहासिक परिसर आहे. याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राज्य शासनाकडे निधीचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.- सुवर्णा सूर्यवंशी, (सरपंच, कसबा बीड)