शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कसबा बावड्यात आॅर्डर, आॅर्डर...!

By admin | Updated: February 9, 2016 00:46 IST

पक्षकार, वकिलांची लगबग : जुन्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात नीरव शांतता

कोल्हापूर : कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळील नव्यानेच उभारण्यात आलेल्या न्यायसंकुलाचे रविवारी दिमाखात उद्घाटन झाले अन् सोमवारपासून न्यायदानाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली. नव्या इमारतीच्या आकर्षक बांधकामामुळे सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरील औत्सुक्याचे भाव पाहायला मिळत होते; तर दुसरीकडे नेहमी गजबजलेल्या सीपीआर परिसरात गर्दीअभावी थोडीशी उसंत, तर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात निरव शांतता पाहायला मिळाली. त्यामुळे या परिसरात दररोज पाहायला मिळणारी वाहतुकीची कोंडी मात्र सोमवारी अभावानेच पाहायला मिळाली.भाऊसिंगजी रोडवर असलेले जिल्हा व सत्र न्यायालयातील कौटुंबिक न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालये नूतन न्यायसंकुलामध्ये स्थलांतर करण्यात आली आहेत. सुबक बांधकाम आणि चार मजली अशी ही भव्य इमारत आहे. सोमवारी पहिल्या दिवशी सकाळपासून पक्षकार, वकील या न्यायसंकुलात कामकाजासाठी येऊ लागले. मात्र, कोणता विभाग कोठे आहे, कितव्या मजल्यावर आहे, हे समजत नव्हते. काही पक्षकार तर कठड्याचा आधार घेऊन बसले होते. पक्षकारांबरोबर त्यांचे वकीलही तळमजल्यावरून चौथ्या मजल्यावर ये-जा करत होते. त्यांचीही पक्षकारांबरोबर दमछाक होत होती. प्रत्येक पोलीस ठाण्याचे न्यायालयीन कामकाज पाहणारे पोलीस कॉन्स्टेबलही याठिकाणी थांबून होते. याचबरोबर ज्येष्ठ वकील यांच्यासह शिकाऊ वकील हे पक्षकारांसोबत चर्चा करत थांबले होते. काही वकिलांनी तर आपल्या मोबाईलमध्ये नव्या इमारतीच्या पायऱ्यांवर उभारून सेल्फी काढली. कसबा बावडा येथील नवीन न्यायसंकुलात उपाहारगृहाची सोय नसल्यामुळे पक्षकार, वकिलांनी न्यायालयाबाहेरील चहा टपऱ्यांचा आधार घेत दिवस काढला. न्यायसंकुलात सकाळपासून सुरू असलेली गजबज दुपारनंतर थोडी-थोडी कमी झाली.दुसरीकडे, सीपीआर समोरील जुन्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात दररोज असणारी पक्षकारांची, वकिलांची गर्दी, वाहतुकीची कोंडी सोमवारी मात्र पाहायला मिळाली नाही. जिल्हा व सत्र न्यायालय स्थलांतर झाल्याने भाऊसिंगजी रोड व चिमासाहेब महाराज चौकात वाहनांचा भार मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे पहायला मिळाले. (प्रतिनिधी)