शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

कसबा बावडा जलउपसा केंद्र बंदच

By admin | Updated: December 16, 2014 00:18 IST

लाखोंची मशिनरी ‘स्क्रॅप’ : तीन वर्षांपासून टाळे असल्याने केंद्राच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य

रमेश पाटील - कसबा बावडा -राजाराम बंधाऱ्याजवळील बावडा जल उपसा केंद्र गेल्या अडीच वर्षांपासून बंद करण्यात आल्याने उपसा केंद्रातील लाखो रुपयांची मशिनरी आता स्क्रॅप झाली आहे. दरम्यान, हे उपसा केंद्र सध्या स्टँडबाय ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.या उपसा केंद्रातून दूषित पाण्याचा उपसा होतो. त्यामुळे हे केंद्र त्वरित बंद करावे व शिंगणापूर उपसा केंद्रातून उपसलेले पाणी फिल्टर करून ‘ई’ वॉर्डला पुरवावे, अशी मागणी होत होती. त्यामुळे बावडा जलउपसा केंद्र बंद करण्यात आले. या केंदा्रतील पाण्याच्या मोटारीचा वापर फक्त अन्य ठिकाणी होऊ शकला. अन्य माशिनरीचा वापर मात्र महापालिकेला अन्य ठिकाणी करता येऊ शकलेला नाही. कारण मशिनरी हे बांधकामाच्या डिझाईननुसार तयार करून बसविण्यात आल्या होत्या. पाणी उपसा केंद्राने अंतर, पाईप, पंप, मोटारे आदी उपसा केंद्राच्या क्षमतेनुसार बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या साहित्याचा अन्य ठिकाणी उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे सध्या ही मशिनरी स्क्रॅप झाली आहे.दरम्यान, उपसा केंद्र जरी बंद असले, तरी या केंद्राच्या आवारात बुधवार, शुक्रवार आणि रविवारी रस्सामंडळ पार्टी होत आहेत. त्यामुळे उपसा केंद्राच्या समोरच मद्याच्या बाटल्या आणि कचरा वाढत चालला आहे. या उपसा केंद्राची इमारत मात्र अद्यापही टोलेजंग अशी आहे. या इमारतीचा उपयोग असा काही कारणासाठीच होतो काय, हे महापालिकेने पाहणे गरजेचे आहे. उपसा केंद्राचा आवार खूप मोठा आहे. उपसा केंद्र सध्या स्टँडबाय अवस्थेत असले, तरी भविष्यात त्याचा वापर पूरनियंत्रण कक्ष किंवा एखाद्या गोडावूनसाठी होऊ शकतो. महापालिकेने त्यादृष्टीने त्याकडे पाहणे गरजेचे आहे.मशिनरीचा वापर होऊ शकत नाहीसध्या उपसा केंद्र बंद आहे. शक्य आहे त्या मशिनरींचा वापर अन्यत्र करण्यात आला आहे. मात्र, अन्य इतर मशिनरींचा दुसऱ्या ठिकाणी वापर होऊ शकत नाही. ही वस्तूस्थिती आहे.- मनीष पवार, जल अभियंता, कोल्हापूर महानगरपालिका