शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

पर्यटकांना खुणावतोय कास-बामणोलीचा पाऊस

By admin | Updated: July 27, 2014 22:45 IST

हिरवळ दाटली चोहिकडे : छोट्या धबधब्यांखाली भिजण्याचा आनंद

बामणोली : पावसामुळे कास-बामणोली परिसराचे सृष्टिसौंदर्य बहरून आले आहे. येथील डोंगरकड्यांवरून कोसळणारे छोटे धबधबे, हिरव्या पाऊलवाटा अन् बामणोली जलाशय खुणावू लागल्याने याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे.सलग आलेल्या सुट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटक कास-बामणोली परिसरात गर्दी करू लागले आहेत. शनिवारी सकाळपासूनच पर्यटकांच्या गाड्या सांबरवाडी घाटातून कासकडे निघाल्या होत्या. गेले पंधरा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे अधूनमधून रिमझिम सरींमध्ये भिजण्याचा आनंद लुटताना पर्यटक दिसत होते. हौशी पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला थांबून जेवणावर यथेच्छ ताव मारला. साबंरवाडी येथे पोलिसांनी चेकनाका सुरू केल्याने अनेक जोडप्यांची आज पंचाईत झाली. शनिवारी दिवसभरात पुणे, मुंबई येथील सुमारे ११० वाहनांमधून २५० पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.कास तलाव तसेच रस्त्यालगतच्या डोगरकडांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांत भिजण्याचा मनसोक्त आनंद पर्यटकांनी लुटला. कोयना धरण निम्म्याहून अधिक भरल्याने तसेच बामणोलीचा बोट क्लब तीन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झाल्याने शनिवारी अनेक पर्यटकांनी नौकाविहाराचाही आनंद लुटला. अनेक तरुण धूमस्टाईलने बाईक चालवत असल्याने चेक नाक्यावरील पोलिसांना दुचाकीस्वारांना योग्य समज द्यावी. (वार्ताहर)कास पठारावर प्रवेश शुल्क आकारणी सुरूकास पुष्प पठारावर आज (शनिवार)पासून वन समित्यांमार्फत पर्यटकांना प्रवेशशुल्क आकारण्यास प्रारंभ झाला. कास पुष्प पठारावर फुलांचा हंगाम सुरू होण्यास सुमारे सव्वा महिन्याचा कालावधी बाकी असतानाही अनेक पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ठोसेघर परिसरात पर्यटकांचा धांगडधिंगापरळी : ठोसेघर धबधबा हा पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनला आहे. संततधार पावसामुळे हा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागल्याने पर्यटकांची याठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. मात्र, मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे, बेदरकार वाहने चालविणे, छेडछाड करणे असे प्रकार काही अतिउत्साही पर्यटकांकडून होत असल्याने इतरांना मुक्त आनंद लुटता येत नाही. पावसामुळे ठोसेघर धबधबा, चाळकेवाडीचे विस्तृत पठार, रंगबेरंगी रानफुले, कधी रिमझिम पाऊस तर कधी दाट धुके असे स्वर्गीय वातावरण येथे असल्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांची येथे गर्दी वाढत असते. मात्र, सर्वांना निसर्गसौंदर्याचा आनंद लुटता यावा, यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. राज्यभरातून पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात येत असतात. त्यांना सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेता यावा, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शुनिवारी सुटी असल्यामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी होती. पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून पर्यटकांनी हजेरी लावली होती.